निशी अन् श्रीनूचं होणार लग्न? लालीने ऐन दिवाळीत घातली निशीला लग्नाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2023 17:32 IST2023-11-15T17:31:20+5:302023-11-15T17:32:13+5:30

Sarkahi tichach sathi: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दाईची आणि लाली, निशीला लग्नाची मागणी घालणार आहेत.

Will Nishi and Srinu get married Lali asked Nishi for marriage on Diwali | निशी अन् श्रीनूचं होणार लग्न? लालीने ऐन दिवाळीत घातली निशीला लग्नाची मागणी

निशी अन् श्रीनूचं होणार लग्न? लालीने ऐन दिवाळीत घातली निशीला लग्नाची मागणी

अल्पावधीत लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे 'सारं काही तिच्यासाठी'. खुशबू तावडे आणि अशोक शिंदे यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका सध्या झी मराठीवर गाजत आहे. यामध्येच निशी आणि ओवी या बहिणींची जोडी प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय होत आहे. ओवीच्या येण्यामुळे उमा आणि निशी यांचा आत्मविश्वास वाढला आहे.त्यामुळे उमाच्या पाठिंब्यामुळे निशी आता बॅटमिंटन खेळू लागली आहे. परंतु, त्याच आता तिला ऐन दिवाळीत लग्नाची मागणी आली आहे. त्यामुळे या मालिकेत मोठा ट्विस्ट आला आहे.

सध्या 'सारं काही तिच्यासाठी' या मालिकेत दिवाळी सेलिब्रेशन सुरु आहे. खोतांच्या घरात मोठ्या दणक्यात पण तितक्याच पारंपरिक पद्धतीने दिवाळी साजरी केली जात आहे. यामध्येच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दाईची आणि लाली, निशीला लग्नाची मागणी घालणार आहेत. ज्यामुळे निशीच्या पायाखालची जमीन सरकते.

'सारं काही तिच्यासाठी' ह्या मालिकेत निशीचा संघर्ष चालूच आहे. आपले बॅडमिंटन खेळण्याचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता तिचे सगळे प्रयत्न सुरु आहेत. दिवाळीच्या दिवशी ही निशाला सरावासाठी जावं लागणार म्हणून निशी आणि ओवी टेन्शन मध्ये आहेत. त्यात लक्ष्मीपूजनच्या दिवशी निशी घरातून गायब असल्याने घरात गोंधळ होणे आणि ती थोडक्यात पकडली जाण्यापासून वाचते. यामध्येच ओवीला श्रीनू दिवाळीची खास भेट देतो.तर, निशीला नीरजकडून भेटवस्तू मिळते. त्यामुळे आता या मालिकेत लवकरच लव्हस्टोरीही खुलताना पाहायला मिळणार आहे.

दरम्यान, ओवी आणि निशीला दिवाळीचं जरी गिफ्ट मिळालं असलं तरीदेखील त्यांचा हा आनंद फार काळ टिकणार नाही. कारण, भाऊबीजेच्या दिवशी दाईची आणि लाली निशीसाठी लग्नाची मागणी घालणार आहेत. त्यांचं हे बोलणं ऐकून निशीच्या पायाखालची जमीन सरकते. पण, आता निशीला आलेल्या मागणीवर रघुनाथ आणि उमा यांचं काय उत्तर असेल, ते काय निर्णय घेतील हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
 

Web Title: Will Nishi and Srinu get married Lali asked Nishi for marriage on Diwali