​नामकरणमध्ये बरखा बिष्ट पुनरागमन करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2018 16:32 IST2018-01-02T11:02:52+5:302018-01-02T16:32:52+5:30

स्टार प्लसवरील नामकरण ही मालिका गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेमध्ये नुकताच प्रेक्षकांना सहा महिन्यांचा लीप ...

Will Naya Nominated to Come Back? | ​नामकरणमध्ये बरखा बिष्ट पुनरागमन करणार?

​नामकरणमध्ये बरखा बिष्ट पुनरागमन करणार?

टार प्लसवरील नामकरण ही मालिका गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेमध्ये नुकताच प्रेक्षकांना सहा महिन्यांचा लीप घेतलेला पाहायला मिळाला. या लीप नंतर नील आणि अवनी हे विभक्त झालेले दाखवले जाणार आहेत. त्यानंतर मालिकेत नाट्‌यमय वळणे पाहायला मिळणार आहेत. नील म्हणजेच झैन इमामने आपली पत्नी अवनीला तुरूंगात टाकले आहे. त्यामुळे मालिकेत अवनीचा गेटअप देखील प्रेक्षकांना खूप वेगळा पाहायला मिळत आहे. नेहमी साड्यांमध्ये दिसणारी अवनी कैद्याच्या वेशात दिसणार आहे. या ट्रॅकमध्ये प्रेक्षकांना खूप सारा ड्रामा पाहायला मिळणार असून प्रेक्षकांना हे आगामी भाग खूप आवडतील अशी या मालिकेच्या टीमला खात्री आहे.
अभिनेत्री बरखा बिष्टने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. प्यार के दो नाम... एक राधा एक श्याम, काव्यांजली, कसौटी जिंदगी की यांसारख्या मालिकांमधील बरखाच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. नामकरण या मालिकेत तिने आशा ही भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. बरखाने या मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर या मालिकेच्या फॅन्सना प्रचंड दुःख झाले होते. पण आता या मालिकेच्या फॅन्ससाठी एक खूप चांगली बातमी आहे. या शोमध्ये पुन्हा येण्यासाठी बरखाला नुकतेच विचारण्यात आले असल्याचे कळतेय. या मालिकेत विराफ पटेल आणि बरखाची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. पण कथानकाच्या गरजेमुळे मार्चमध्ये मालिकेत बरखाने साकारलेल्या आशा या व्यक्तिरेखेचा मृत्यू झाल्याचे दाखवण्यात आले होते. आता या मालिकेला नाट्‌यमय वळण मिळाले असून सध्या प्रेक्षकांना जेलमधील ट्रॅक पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे निर्माते बरखाच्या पुनरागमनाच्या विचारात असल्याचे म्हटले जात आहे. अवनीच्या आठवणींमधील फ्लॅशबॅक दृश्यांमधून ती दिसणार असल्याची चर्चा आहे. पण बरखाने सध्या अनेक प्रोजेक्ट्‌स स्वीकारले असल्यामुळे ती तिच्या कामात प्रचंड व्यग्र आहे. त्यामुळे ती नामकरण या मालिकेत आशा म्हणून परतणार की नाही असा तिच्या फॅन्सना प्रश्न पडला आहे. 

Also Read : 'या' मालिकेत दिसणार बरखा बिश्त

 

Web Title: Will Naya Nominated to Come Back?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.