​हिना खान बिग बॉसच्या घरात करणार साखरपुडा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2017 10:42 IST2017-12-08T05:12:58+5:302017-12-08T10:42:58+5:30

ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेमुळे हिना खान नावारूपाला आली. या मालिकेत तिने साकारलेली अक्षराची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड ...

Will Hina Khan make Big Boss in the house? | ​हिना खान बिग बॉसच्या घरात करणार साखरपुडा?

​हिना खान बिग बॉसच्या घरात करणार साखरपुडा?

रिश्ता क्या कहलाता है या मालिकेमुळे हिना खान नावारूपाला आली. या मालिकेत तिने साकारलेली अक्षराची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. ही मालिका तिने काही महिन्यांपूर्वी सो़डली. या मालिकेनंतर खतरों के खिलाडी या कार्यक्रमात ती झळकली होती. या कार्यक्रमात देखील तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. सध्या ती प्रेक्षकांना बिग बॉसच्या घरात पाहायला मिळत आहे. बिग बॉसचा यंदाचा सिझन हा प्रचंड कॉन्ट्रोव्हर्शनल आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागापासूनच आपल्याला भांडणं पाहायला मिळत आहेत. 
बिग बॉस या कार्यक्रमात नुकतेच स्पर्धकाच्या घरातली मंडळी त्यांना भेटण्यासाठी बिग बॉसच्या घरात गेले होते. शिल्पा शिंदेची आई, विकास गुप्ताची आई यांनी बिग बॉसच्या घरात जाऊन आपल्या मुलांची भेट घेतली. तसेच अभिनेत्री गौरी प्रधान देखील तिचा पती हितेनला भेटायला बिग बॉसच्या घरात गेली होती. घरात गेल्यानंतर तिने हिनाला चांगलेच सुनावले. ती म्हणाली, हितेन त्याचा एकट्याचा गेम खेळू शकतो. त्याला कोणाच्याही मार्गदर्शनाची अथवा सल्ल्याची गरज नाहीये. खरे तर कार्यक्रमात नुकतेच हिना आणि हितेनची भांडणे झाली होती. त्यावेळी हितेन सगळ्या गोष्टी विकास गुप्ताच्या ऐकतो असे हिना त्याला म्हणाली होती आणि याचमुळे गौरीने हिनाला खडे बोल सुनावले.
आता हिना खानचा प्रियकर रॉकी जैस्वाल देखील प्रेक्षकांना या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे. रॉकी हिनाला भेटण्यासाठी काही मिनिटांसाठी बिग बॉसच्या घरात जाणार आहे. हिना आणि रॉकी यांची भेट ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेच्या सेटवरच झाली होती. तेव्हापासूनच ते दोघे नात्यात आहेत. हिनाच्या फॅन्ससाठी एक खुशखबर आहे. हिना आणि रॉकी बिग बॉसच्या घरात साखरपुडा करणार असल्याची चर्चा आहे. कारण नुकत्याच दाखवण्यात आलेल्या बिग बॉसच्या प्रोमोमध्ये रॉकी हिनाच्या हातात अंगठी घालत असल्याचे दिसत आहे. आता रॉकी आणि हिना बिग बॉसच्या घरात खरंच साखरपुडा करतात की नाही हे आपल्याला काहीच दिवसांत कळेल. 

Also Read : ​आकाश ददलानीने शिल्पा शिंदेला बळजबरीने केले किस; प्रेक्षकांनी म्हटले, ‘घरातील महिला असुरक्षित’!

Web Title: Will Hina Khan make Big Boss in the house?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.