​बाप्पा सगळं बघणार, तरीही पुढच्या वर्षी येणार का? या 'स्टार प्रवाह'च्या व्हिडिओची सोशल मीडियात चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2017 14:12 IST2017-09-05T08:42:52+5:302017-09-05T14:12:52+5:30

​बाप्पा सगळं बघणार, तरीही पुढच्या वर्षी येणार का? या 'स्टार प्रवाह'च्या व्हिडिओची सध्या सोशल मीडियात चांगलीच चर्चा आहे.

Will Bapa see everything, will it still come next year? Social media talk of this 'Star Stream' video | ​बाप्पा सगळं बघणार, तरीही पुढच्या वर्षी येणार का? या 'स्टार प्रवाह'च्या व्हिडिओची सोशल मीडियात चर्चा

​बाप्पा सगळं बघणार, तरीही पुढच्या वर्षी येणार का? या 'स्टार प्रवाह'च्या व्हिडिओची सोशल मीडियात चर्चा

ा दिवस मोठ्या उत्साहाने गणपती बाप्पांचा उत्सव साजरा केल्यानंतर वेळ आली आहे अनंत चतुर्दशीची... बाप्पांना निरोप देण्याची! 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'च्या गजरात बाप्पांना निरोप दिला जाणार आहे. मात्र गणपती बाप्पा खरंच पुढच्या वर्षी येईल का, असा प्रश्न स्टार प्रवाहने 'गणपती बाप्पाने दहा दिवस काय पाहिले?' या व्हिडिओच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. या व्हिडिओची सोशल मीडियात चांगलीच चर्चा आहे.
स्टार प्रवाहने मागील वर्षी अभिनेता रितेश देशमुखसह 'थँक गॉड बाप्पा' हा म्युझिक व्हिडिओ तयार केला होता. त्या व्हिडिओतून बदलत्या गणेशोत्सवावर भाष्य करण्यात आले होते. गणपतीतील सात्विकता संपून त्याचे बाजारीकरण होत असल्याचे म्हटले होते. त्या व्हिडिओला मोठा प्रतिसाद मिळत होता. यंदा तोच विचार पुढे नेण्याचे काम 'गणपती बाप्पाने अकरा दिवस काय पाहिले' हा व्हिडिओ करतोय. या व्हिडिओचे वेगळेपण म्हणजे गणपती बाप्पांच्या दृष्टिकोनातून उत्सवाकडे पाहण्यात आले आहे. त्यामुळे भक्ती ते धांगडधिंगा आणि पर्यावरणाची हानी असा प्रवास यात मांडण्यात आला आहे. त्यात घरी मनोभावे आरती करणारे भाविक ते उत्सवात पत्ते खेळणे, मद्यपान करणे, घरात कोणीच नसणे, डीजे लावून नाचणे, विसर्जन करताना तीन वेळा बुडवणे आणि विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी किनाऱ्यावर पडलेली मूर्ती असे सगळे चित्रण करण्यात आले आहे. या व्हिडिओला तीस हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
उत्सवाची वेगवेगळी रूपं दाखवतानाच एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. विसर्जनावेळी प्रत्येक गणेशभक्त 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'चा जयघोष करत असतो. मात्र गणपती बाप्पांनी दहा दिवस हा असा उत्सव पाहिल्यानंतर खरंच पुढच्या वर्षी ते येतील हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे. आपल्याला विचार करायला लावणारा, आत्मपरीक्षण करायला लावणारा हा व्हिडिओ आहे.




Also Read : स्टार प्रवाहच्या कलाकारांनी गायलेली आरती सोशल मीडियावर हिट

Web Title: Will Bapa see everything, will it still come next year? Social media talk of this 'Star Stream' video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.