'लवंगी मिरची’ मालिकेत अस्मी गोपीनाथला धडा शिकवणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 17:25 IST2023-02-21T17:25:18+5:302023-02-21T17:25:40+5:30
'लवंगी मिरची’ ह्या नवीन मालिकेला प्रेक्षकांचा खूप उत्तम प्रतिसाद मिळतोय.

'लवंगी मिरची’ मालिकेत अस्मी गोपीनाथला धडा शिकवणार?
'लवंगी मिरची’ ह्या नवीन मालिकेला प्रेक्षकांचा खूप उत्तम प्रतिसाद मिळतोय. आतापर्यंत या मालिकेमध्ये आपण पाहिले की खानावळ उद्ध्वस्त करणारे अस्मीच्या हातून निसटले. भूतकाळात गोपीनाथ आपल्याशी आणि आईशी किती वाईट वागलाय, त्याने यामिनीशी कसं दुसरं लग्न केलं ते अस्मी मुन्नूला म्हणजेच आपल्या लहान बहिणीला सांगते.
गुंडांनी धमकावल्यामुळे राधाक्क्याच्या खानावळीत कुणी यायला तयार नाही. जगन ही बातमी गोपानाथ आणि यामिनीला देतो आणि हे ऐकून ते खुप खुश होतात. यामिनी खानावळीत येऊन राधाक्काचा अपमान करते. निशांतला त्याच्या पंटरकडून समजतं कि, खानावळीत कोणीही जात नाही आहे. यामिनीच्या अपमानाने दुखावलेली व खानावळीत एकही गिऱ्हाईक फिरकलं नाही म्हणून हतबल झालेली राधाक्का घर सोडून नदीकाढी जाते. निशांतच्या प्लॅनमुळे खानावळीत परत गिऱ्हाईक चालू होतात.
दुसरीकडे गोपीनाथ राधाक्का घरी एकटी आहे पाहून, राधाक्काच्या घरी पोहोचतो. तिचं मंगळसूत्र खेचून घेतो, हे कळल्यानंतर अस्मी गोपीनाथला म्हणजेच आपल्या बापाला धडा शिकवणार? हे पाहण्यासाठी 'लवंगी मिरची' मालिका पाहावी लागेल.