'....अरुंधतीची दृष्टी बदलेल का?', 'आई कुठे काय करते' फेम मधुराणी प्रभुलकरची पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 13:09 IST2022-04-27T13:09:05+5:302022-04-27T13:09:37+5:30
Aai Kuthe Kay Karte Fame Madhurani Prabhulkar: अरुंधती उर्फ मधुराणी प्रभुलकर हिने इंस्टाग्रामवर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे, जी खूप चर्चेत आली आहे.

'....अरुंधतीची दृष्टी बदलेल का?', 'आई कुठे काय करते' फेम मधुराणी प्रभुलकरची पोस्ट चर्चेत
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांना प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. या मालिकेतील प्रेमळ आणि सर्वांचा विचार करणारी आई म्हणजेच अरुंधती घरघरात पोहचली आहे. अरुंधतीची भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) हिने साकारली आहे. मधुराणी प्रभुलकर सोशल मीडियावर खूप सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. तसेच तिचे मतदेखील मांडताना दिसते. दरम्यान तिने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे, जी खूप चर्चेत आली आहे.
अरुंधती उर्फ मधुराणी प्रभुलकर हिने इंस्टाग्रामवर तिचा आशुतोषचा चष्मा घातलेला फोटो शेअर केला आहे आणि लिहिले की, आशुतोष इतकीच अरुंधतीलाही छान दिसतेय ही फ्रेम... तुम्हाला काय वाटतं?? आशुतोषचा चष्मा लावून अरुंधतीची दृष्टी बदलेल का ??. मधुराणीच्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजरने कमेंट बॉक्समध्ये लिहिले की, हो.. आशुतोषचा चष्मा लावून अरुंधतीची दृष्टी नक्कीच बदलेल पण अनिरुद्धची दृष्टी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही..चष्म्यात खूप गोड दिसतेस अरुंधती.. अशीच आनंदी रहा. तर दुसऱ्या युजरने लिहिले की, दृष्टी नक्कीच बदलेल... शेवटी आशुतोष च्या चष्मा आहे तो... आणखी एका युजरने म्हटले की, खूप छान दिसत आहे तुम्ही... अरूंधती आई. याशिवाय एक युजर म्हणतो की, अरुंधती आणि आशुतोष...तुम्ही ज्या पद्धतीने डायलॉग बोलता. मराठी बोलायचं तर असंच. वाह. तुमचे एकत्र सीन पाहायला खूप आवडते.