​का थांबवले नीती टेलरने ‘गुलाम’चे चित्रीकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2017 13:38 IST2017-04-06T08:08:46+5:302017-04-06T13:38:46+5:30

‘गुलाम’ ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले आहेत. पण या मालिकेच्या सेटवर सगळे काही सुरळीत सुरू नसल्याचे म्हटले ...

Why stop filming of 'slave'? | ​का थांबवले नीती टेलरने ‘गुलाम’चे चित्रीकरण?

​का थांबवले नीती टेलरने ‘गुलाम’चे चित्रीकरण?

ुलाम’ ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले आहेत. पण या मालिकेच्या सेटवर सगळे काही सुरळीत सुरू नसल्याचे म्हटले जात आहे. या मालिकेतील विकास मानकताला आणि नीती टेलर यांच्यात एक वाद निर्माण झाला आहे. हे दोघे एकेकाळी एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स होते. पण आता ते दोघे एकमेकांचे तोंडही पाहात नसल्याची चर्चा आहे. केवळ विकासच नव्हे तर परमसिंहलादेखील नीतीचे वागणे पटत नाहीये. 
मालिकेच्या सेटवर नीतीला तिच्या मेकअपमननने केलेले मेकअप आवडत नसल्याने विकासने त्याच्या मेकअपमनकडून तिला मेकअप करायला सांगितला. पण विकासचे चित्रीकरण आधी होणार असल्याने त्याचा मेकअपमन आधी त्याचा मेकअप करेल असे तो नीतीला म्हणाला. पण याचा नीतीला राग आला. तिचाच मेकअप आधी झाला पाहिजे असे तिचे म्हणणे होते. त्यामुळे रागाच्या भरात ती सेटवरून निघून गेली आणि यामुळे चित्रीकरण खोळंबले. निर्मात्यांनी मध्यस्ती केल्यामुळे ती सेटवर पुन्हा आली. याविषयी निती सांगते, "चित्रीकरण माझ्यामुळे नव्हे तर दुसऱ्याच कोणत्यातरी कलाकारामुळे थांबवण्यात आले होते. त्या कलाकाराचे नाव मी सांगू इच्छित नाही. पण त्या दिवशी चित्रीकरणासाठी दोन युनिट होती. त्यातील माझ्या युनिटचे चित्रीकरण प्रथम होणार होते. त्यामुळे मला मेकअप करायचा होता. पण मेकअपमन उपलब्ध नसल्याने मी वैतागले होते. पण यामुळे कोणासोबतही माझे वाद झालेले नाहीत." पण विकासचे या सगळ्याविषयी वेगळे मत आहे. तो सांगतो, "त्या दिवशी सेटवर जे काही घटले ते खरे तर घडण्याची गरजच नव्हते. पण मालिकेच्या चित्रीकरणावर याचा परिणाम होऊ नये यासाठी दुसऱ्याच दिवशी मी तिच्याशी बोललो. नीतीनेदेखील या घटनेसाठी माझी माफी मागितली आणि निर्मात्यांचीदेखील ती माफी मागेल असे ती मला म्हणाली." 

Web Title: Why stop filming of 'slave'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.