करणच्या पत्नीला का द्यावे लागले मुलाबाबत स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2016 14:41 IST2016-10-18T14:41:21+5:302016-10-18T14:41:21+5:30
ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत नैतिकची भूमिका साकारणाऱ्या करण मेहराने नुकत्याच या कार्यक्रमाला रामराम ठोकला. करणने साकारलेली ...
.jpg)
करणच्या पत्नीला का द्यावे लागले मुलाबाबत स्पष्टीकरण
य रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत नैतिकची भूमिका साकारणाऱ्या करण मेहराने नुकत्याच या कार्यक्रमाला रामराम ठोकला. करणने साकारलेली नैतिकची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. गेली सात वर्षं तो ही भूमिका साकारत होता. पण त्याने तब्येतीच्या कारणामुळे ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. गेल्या काही दिवसांपासून तो छोट्या पडद्यापासून दूर आहेत. त्याचे फॅन्स त्याला चांगलेच मिस करत होते. पण आता तो बिग बॉसच्या घरात प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून करणने एंट्री केली आहे. करण बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर अनेकजणांच्या भुवया उंचावल्या आहेत. करण बिग बॉसमध्ये जाऊन काय करतोय याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. बिग बॉस म्हटले की, काॅर्न्टोव्हर्सीही आलीच. करण बिग बॉसमध्ये गेल्यावर त्याच्याबाबत काही उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. त्याने काही वर्षांपूर्वी मॉडेल निशा रावळसोबत लग्न केले आहे. करण आणि निशा नच बलिये या कार्यक्रमातही झळकले होते. करण आणि निशाला एक वर्षांचा मुलगा असून त्याने ही गोष्ट मीडियापासून लपवली आहे असे काही दिवसांपासून म्हटले जात आहे. करणने या गोष्टीबाबत स्पष्टीकरणदेखील दिले होते. पण करण बिग बॉसमध्ये गेल्यानंतर पुन्हा या चर्चेला ऊत आला आहे. यावर करणची पत्नी निशा सांगते, "आम्हाला मुलगा आहे अशी अफवा कोण पसरवत आहे हेच मला कळत नाही. आमच्या फॅन्सने अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नये. आमच्या आयुष्यात गोड बातमी असल्यास आम्ही नक्कीच आमच्या फॅन्ससोबत ती शेअर करू."