का करायचे नाहीये कपिल शर्माला छोट्या पडद्यावर फिरंगीचे प्रमोशन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 14:13 IST2017-10-16T08:43:54+5:302017-10-16T14:13:54+5:30

Why Kapil Sharma is not promoting furangi on small screen? | का करायचे नाहीये कपिल शर्माला छोट्या पडद्यावर फिरंगीचे प्रमोशन?

का करायचे नाहीये कपिल शर्माला छोट्या पडद्यावर फिरंगीचे प्रमोशन?

कपिल शर्मा शो हा सगळ्या बॉलिवूडच्या कलाकारांचा आवडता कार्यक्रम होता. त्यामुळे प्रत्येक कलाकार आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी याच कार्यक्रमाला प्राधान्य देत होते. त्यामुळे सलमान खान, शाहरुख खान, दीपिका पादुकोण, प्रियांका चोप्रा यांसारखे प्रसिद्ध कलाकार देखील आपल्याला या कार्यक्रमात आपल्याला पाहायला मिळाले होते. गेल्या काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमाने काही दिवसांचा ब्रेक घेतला. त्यामुळे सध्या सोनी वाहिनीवर हिट असलेल्या द ड्रामा कंपनी या कार्यक्रमात बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांचे प्रमोशन केले जात आहे. तसेच अनेक रिअॅलिटी शो आणि तारक मेहता का उल्टा चष्मा यांसारख्या मालिकांमध्ये देखील चित्रपटांचे प्रमोशन होत आहे. 
कपिल शर्माचा फिरंगी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. कपिलचा हा दुसरा चित्रपट आहे. कपिलने याआधी किस किस को प्यार करू या चित्रपटातही काम केले होते. पण याच्या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर यश मिळवता आले नाही. पण फिरंगी या चित्रपटाकडून त्याला खूप साऱ्या अपेक्षा आहेत. या चित्रपटाचे सध्या तो जोरदार प्रमोशन करत आहे. कपिल हा छोट्या पडद्यावरचा प्रसिद्ध अभिनेता आहे. पण असे असले तरी फिरंगी या चित्रपटाचे छोट्या पडद्यावर प्रमोशन करायचे नाही असे कपिलने ठरवले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक राजीव धिंगरा सांगतात, कपिल हा प्रचंड प्रसिद्ध आहे. आज लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक जण त्याचे फॅन्स आहेत. त्यामुळे त्याला छोट्या पडद्यावर चित्रपटाचे प्रमोशन करण्याची गरजच नाहीये. 
फिरंगी या चित्रपटात भारतातील एका छोट्या शहरात राहाणारा मुलगा एका एनआरआयच्या प्रेमात पडतो आणि त्यानंतर पुढे पुढे काय होते हे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 
कपिल शर्मा द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या कार्यक्रमामुळे नावारूपाला आला. त्यानंतर त्याने कॉमेडी सर्कस या कार्यक्रमाच्या अनेक सिझनचे विजेतेपद मिळवले. त्याच्या कॉमेडी नाइट्स विथ कपिल या कार्यक्रमाला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावरच घेतले होते. छोट्या पडद्यावर यश मिळाल्यानंतर आता कपिल मोठ्या पडद्यावर त्याचे भाग्य आजमावत आहे. 

Also Read : कपिल शर्मा फिरंगी या चित्रपटासाठी गाणार हे गाणे

Web Title: Why Kapil Sharma is not promoting furangi on small screen?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.