सुपर डान्सर २ च्या चित्रीकरणाच्या वेळी अनुराग बासूला का झाले अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2017 14:37 IST2017-11-01T09:07:24+5:302017-11-01T14:37:24+5:30

सुपर डान्सर या कार्यक्रमातील सगळेच स्पर्धक प्रेक्षकांचे मन जिंकताना दिसत आहेत. या कार्यक्रमात प्रेक्षकांना एकाहून एक सरस परफॉर्मन्स पाहायला ...

Why did Anurag Basu get tears in the filming of Super Dancer 2? | सुपर डान्सर २ च्या चित्रीकरणाच्या वेळी अनुराग बासूला का झाले अश्रू अनावर

सुपर डान्सर २ च्या चित्रीकरणाच्या वेळी अनुराग बासूला का झाले अश्रू अनावर

पर डान्सर या कार्यक्रमातील सगळेच स्पर्धक प्रेक्षकांचे मन जिंकताना दिसत आहेत. या कार्यक्रमात प्रेक्षकांना एकाहून एक सरस परफॉर्मन्स पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या कार्यक्रमात शिल्पा शेट्टी, गीता कपूर आणि अनुराग बासू परीक्षकाची भूमिका साकारत आहे. अनुराग बासूला या कार्यक्रमात नुकतेच एक खूप चांगले सरप्राईज मिळाले असून त्यामुळे तो खूपच खूश आहे.
अनुराग बासू आणि संगीत दिग्दर्शक प्रीतम चक्रवर्ती हे खऱ्या आयुष्यात खूप चांगले फ्रेंड्स असल्याचे खूपच कमी लोकांना माहीत आहे. ते दोघे अनेक वर्षं एकमेकांचे शेजारी देखील होते. या कार्यक्रमाच्या दरम्यान प्रितमने एक विशेष व्हिडिओ मेसेज शेअर केला आहे. या व्हिडिओत त्याने अनुराग आणि त्यांनी एकत्र घालवलेल्या दिवसांविषयी सांगितले. त्यांच्या जुन्या आठवणी त्याने शेअर केल्या. अनुराग बासू आणि प्रितमची मैत्री अतिशय घट्ट असल्याने हा व्हिडिओ पाहिल्यावर अनुरागला त्याचे अश्रू अनावर झाले. याविषयी प्रीतम सांगतो, "अनुरागला मी १९९८ पासून ओळखतो. मी पहिल्यांदा मुंबईला आलो, तेव्हा २००४ साली आम्ही शेजारी बनलो, तेव्हापासून खऱ्या अर्थाने आमच्या मैत्रीला सुरुवात झाली. अनुराग खूपच चांगला व्यक्ती असल्यामुळे त्याच्यासोबत मैत्री करायला सगळ्यांनाच आवडते. तो अतिशय खोडकर आहे. पण तितकाच तो सर्वांची काळजी घेणारा देखील आहे. त्याच्याबरोबर असताना तुम्हाला कधीच कंटाळा येऊ शकत नाही. त्याला मजा-मस्ती करायला आवडत असल्याने तो त्याच्यासोबत असलेल्या लोकांना नेहमीच हसवतो. मी मुंबईला आल्यावर माझी ओळख अनुरागशी झाली याचा मला खूप आनंद आहे. हे सगळे ऐकून अनुरागला काय रिअॅक्ट करावे हेच कळत नव्हते. त्याच्यासाठी हे सगळे अनपेक्षित होते. अनुराग बासू हे सगळे ऐकल्यावर प्रचंड इमोशनल झाला होता. त्याने देखील प्रितम आणि त्याच्या आयुष्यातील किस्से तिथे उपस्थित असलेल्या लोकांना सांगितले. 
अनुराग बासूच्या खेळकर स्वभावाविषयी सगळ्यांनाच चांगल्याप्रकारे माहीत आहे. तो सेटवर असताना सगळेच खूप खूश असतात. सेटवर तो सगळ्यांची खोडी काढत असतो. तो सगळ्यांना खूप हसवतो आणि खूप सारे जोक्स मारतो.

Also Read : सुपर डान्सर २ चा स्पर्धक आकाश वर्माने अनुराग बासू यांना दिले हे नाव

Web Title: Why did Anurag Basu get tears in the filming of Super Dancer 2?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.