फरहा कोणाला निवडणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2016 17:56 IST2016-10-06T12:26:07+5:302016-10-06T17:56:07+5:30
झलक दिखला जा या कार्यक्रमाच्या सुरुवातीच्या सिझनमध्ये फरहा खानने परीक्षकाची भूमिका साकारली होती. ती आठ वर्षांनंतर या कार्यक्रमाच्या सेटवर ...

फरहा कोणाला निवडणार?
झ क दिखला जा या कार्यक्रमाच्या सुरुवातीच्या सिझनमध्ये फरहा खानने परीक्षकाची भूमिका साकारली होती. ती आठ वर्षांनंतर या कार्यक्रमाच्या सेटवर परतली. फरहा इतक्या वर्षांनंतर झलक दिखला जाच्या सेटवर येत असल्याने तिची ही उपस्थिती अविस्मरणीय व्हावी यासाठी करणने तिच्यासोबत एक डान्स परफॉर्मन्स सादर केला. करण आणि फरहाने कुछ कुछ होता है या चित्रपटात एकत्र काम केले होते. करणने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते तर फरहा या चित्रपटाची कोरिओग्राफर होती. त्यामुळे करणने त्यांच्या या आठवणींना उजाळा द्यायाचे ठरवले. या चित्रपटातील एका गाण्यावर दोघे नृत्य सादर करत होते. ते चांगल्याच मुडमध्ये आले असताना मनिष पॉलने येऊन त्यात व्यत्यत आणला. तोदेखील त्यांच्यासोबत नाचू लागला. मनिषला पाहिल्यानंतर करणला निवडायचे की मनिषला हा पेच फरहाला पडला होता.