कोण बनणार कोणाचा पार्टनर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2016 17:50 IST2016-10-06T12:20:28+5:302016-10-06T17:50:28+5:30
फ्रेशर्स या मालिकेतील आजच्या पिढीची धमाल मस्ती, त्यांची अतरंगी यारी प्रेक्षकांना खूप आवडते. या मालिकेची कथा ही कॉलेजयुवकांची असल्याने ...

कोण बनणार कोणाचा पार्टनर?
फ रेशर्स या मालिकेतील आजच्या पिढीची धमाल मस्ती, त्यांची अतरंगी यारी प्रेक्षकांना खूप आवडते. या मालिकेची कथा ही कॉलेजयुवकांची असल्याने अनेक कॉलेजयुवकांना ही त्यांचीच कथा असल्यासारखे वाटते. सध्या सगळीकडे दांडिया आणि गरबा लोक खेळत आहेत. दांडिया आणि गरबाची क्रेझ तरुण-तरुणींमध्ये अधिक पाहायला मिळते. आता फ्रेशर्स या मालिकेतसुद्धा प्रेक्षकांना नवरात्रीची धमाल पाहायला मिळणार आहे. वेगवेगळ्या गावातून, शहरातून आलेले हे फ्रेशर्स आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नवरात्रीची धमाल मस्ती करणार आहेत. दांडिया खेळताना आपल्याला आवडणारी व्यक्ती आपली पार्टनर असावी असे सगळ्यांना वाटते. त्यामुळे आता फ्रेशर्समध्ये दांडिया खेळताना कोण कोणाचे पार्टनर बनतेय हे पाहाणे इंटरेस्टिंग होणार आहे.