कोण होणार नवीन पोस्ट मास्टर? निरगुडकर की गुळस्कर.....
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 15:23 IST2023-02-01T15:23:22+5:302023-02-01T15:23:49+5:30
Post Office Ughada Aahe : पारगावातल्या पोस्ट ऑफीसमधली ही गोष्ट आहे. या मालिकेतल्या कुलकर्णी, गुळस्कर, निरगुडकर अशा काही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत.

कोण होणार नवीन पोस्ट मास्टर? निरगुडकर की गुळस्कर.....
सोनी मराठी (Sony Marathi) वाहिनी वैविध्यपूर्ण कार्यक्रमांद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करते. आता अजून एक वेगळी मालिका आपल्याला पाहायला मिळते आहे. 'पोस्ट ऑफीस उघडं आहे...' (Post Office Ughada Aahe) ही मालिका सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी दाखल झाली आहे. वेगळ्या विषयांच्या आणि धाटणीच्या मालिका आपल्याला सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळतात.
पारगावातल्या पोस्ट ऑफीसमधली ही गोष्ट आहे. या मालिकेतल्या कुलकर्णी, गुळस्कर, निरगुडकर अशा काही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. पोस्ट मास्टर कुलकर्णी यांना प्रतीक्षा आहे त्यांच्या बदलीची! तसेच निरगुडकरांना चिंता आहे रंजना काय म्हणेल याची! पण आता पोस्ट मास्टर कुलकर्णी यांची बदली नक्की झाली आहे आणि ते आता त्यांच्या गावी परतणार आहेत. त्यामुळे नवीन पोस्ट मास्तर कोण होणार, याची पारगावच्या संपूर्ण पोस्ट ऑफिसमध्ये चर्चा आहे.
पारगावच्या पोस्ट ऑफिसमध्ये सध्या वेगळे वातावरण आहे. गुळस्कर सध्या त्यांच्या विभागात पोस्ट पेटी लागावी यासाठी धडपड करत आहेत आणि त्याचे श्रेय त्यांना मिळावे यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. तसेच निरगुडकर रंजनाला खूश करण्यासाठी धडपड करत आहेत. त्यांना असा अंदाज आला आहे की, पुढचे पोस्ट मास्तर ते स्वतःच असणार आहेत. म्हणून त्यांनी नवीन फ्रीज घेतला आहे. पण ज्या वेळी नवीन पोस्ट मास्टर कोण आहे, ह्याची घोषणा होईल; त्या वेळी मालिकेत खरी मज्जा पाहायला मिळेल.
'पोस्ट ऑफीस उघडं आहे...' ही मालिका गुरुवार ते शनिवार रात्री ९ वाजता सोनी मराठी वाहिनीवर पाहयला मिळेल.