करिष्मा तन्नावर कोण भडकलं ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2016 15:31 IST2016-10-01T10:01:43+5:302016-10-01T15:31:43+5:30
'झलक दिखला जा-9' या डान्स रियालिटी शोचं जेतेपद पटकावण्यासाठी सर्व स्पर्धक बरीच मेहनत घेतायत. प्रत्येक शोमध्ये धमाकेदार परफॉर्मन्स देत ...

करिष्मा तन्नावर कोण भडकलं ?
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">'झलक दिखला जा-9' या डान्स रियालिटी शोचं जेतेपद पटकावण्यासाठी सर्व स्पर्धक बरीच मेहनत घेतायत. प्रत्येक शोमध्ये धमाकेदार परफॉर्मन्स देत जजेसची मनं जिंकण्याचा ते प्रयत्न करतात. अभिनेत्री आणि या शोमधील स्पर्धक करिष्मा तन्नासुद्धा या शोचं विजेतेपद पटकावण्यासाठी चांगलाच घाम गाळतेय. कोरियोग्राफर आणि पार्टनर राजीव देव याच्यासह करिष्मा जोरदार रिहर्सल करतेय. शोच्या वेळी दमदार परफॉर्मन्स व्हावा यासाठी या रिहर्सलमध्ये राजीव करिष्माकडून जोरदार रिहर्सल करुन घेतोय. मात्र रिहर्सल परफेक्ट व्हावी आणि शोच्या वेळी दमदार परफॉर्मन्स करिष्मानं द्यावा यासाठी राजीव ब-याचदा तिच्यावर ओरडल्याचं ऐकायला मिळतंय. इतकंच नाही तर करिष्माशी तो रागाने बोलत असल्याच्याही चर्चा रंगल्यात. करिष्मा योग्यरितीने रिहर्सल करत नसल्याने अनेकदा राजीवचा पारा चांगलाच चढतो. मात्र यामागे कोणताही वैयक्तीक राग नसल्याचं राजीवनं स्पष्ट केलंय. दोघांमध्ये गुरु-शिष्यासारखं नातं असून रिहर्सलच्यावेळीसुद्धा त्यानुसारच वागत असल्याचं त्यानं म्हटलंय.