पहचान कौन? चिमुरडी गंगूबाई झाली १७ वर्षांची, तिचे ग्लॅमरस फोटो पाहून व्हाल दंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 19:30 IST2019-04-17T19:30:00+5:302019-04-17T19:30:00+5:30
आपल्या कॉमेडीने रसिकांना लोटपोट व्हायला लावणारी सलोनी सध्या सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

पहचान कौन? चिमुरडी गंगूबाई झाली १७ वर्षांची, तिचे ग्लॅमरस फोटो पाहून व्हाल दंग
छोट्या पडद्यावर तीन वर्षांच्या एका मुलीने गंगूबाईच्या भूमिकेतून रसिकांना खळखळून हसायला भाग पाडले होते. ही गंगूबाई आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. मात्र बऱ्याच कालावधीपासून ही गंगूबाई म्हणजेच सलोनी डॅनी छोट्या पडद्यापासून गायब आहे. हीच सलोनी आता १७ वर्षांची झाली असून ती स्टायलिश झाली आहे की तिला ओळखणे देखील कठीण झाले आहे.
गंगूबाई म्हणून प्रचलित झालेली कॉमेडीयन सलोनी डॅनीने तीन वर्षांची असताना 'कॉमेडी सर्कस महासंग्राम' शोमधून छोट्या पडद्यावर एन्ट्री केली आणि या पदार्पणातच ती गंगूबाई म्हणून घराघरात पोहचली.
या चिमुरडीने त्यावेळी अनेक लोकप्रिय विनोदवीरांना टक्कर दिली होती.
'कॉमेडी सर्कस महासंग्राम' शोनंतर तिला ओळख मिळाली. काही काळातच ती अनेक प्रसिद्ध कॉमेडियनसोबत वेगवेगळे शो करताना दिसली.
चिमुरड्या सलोनीचे टॅलेंट पाहून प्रेक्षक थक्क झाले होते.
आता ही चिमुरडी सलोनी १७ वर्षांची झाली आहे आणि आता तिला ओळखणेदेखील कठीण झाले आहे. तिचा स्टायलिश अंदाज पाहून सोशल मीडियावर सर्वच चकीत झाले आहेत.
'कॉमेडी सर्कस महासंग्राम'नंतर सलोनी 'इक्का-दुक्का' या मालिकेतही दिसली. मात्र या मालिकेत तिला म्हणावी तशी लोकप्रियता मिळाली नाही. '
बड़े भइया की दुल्हनिया' या मालिकेत ती शेवटची झळकली. त्यानंतर ती छोट्या पडद्यापासून गायब झाली.
तर २०१० साली 'नो प्रोब्लेम' चित्रपटात तिने कॅमिओ केला होता.