​ओळखा पाहू कोण आहे ही फराह खानसोबत नाचणारी आजची बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2017 16:35 IST2017-09-26T11:05:26+5:302017-09-26T16:35:26+5:30

लिप सिंग बॅटल या कार्यक्रमात प्रेक्षकांना प्रत्येक भागात बॉलिवूडमधील आजचे आघाडीचे कलाकार पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमात रवीना टंडन, ...

Who is the first Bollywood Bollywood actress to dance with Farah Khan? | ​ओळखा पाहू कोण आहे ही फराह खानसोबत नाचणारी आजची बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री?

​ओळखा पाहू कोण आहे ही फराह खानसोबत नाचणारी आजची बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री?

प सिंग बॅटल या कार्यक्रमात प्रेक्षकांना प्रत्येक भागात बॉलिवूडमधील आजचे आघाडीचे कलाकार पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमात रवीना टंडन, आयुषमान खुराणा, फरहान अख्तर यांसारख्या बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध कलाकारांनी हजेरी लावली आहे. लिप सिंग बॅटल या या कार्यक्रमात नुकतीच बॉलिवूडमधील एक आघाडीची अभिनेत्री आली होती. तिने अमिताभ बच्चन यांच्या एका गाण्यावर नृत्य सादर केले.
या अभिनेत्रीने या कार्यक्रमातील आपला परफॉर्मन्सच अमिताभ बच्चन यांना समर्पित केला. अमिताभ बच्चन यांच्या एका चित्रपटातील गाण्यावर नृत्य करण्यासाठी तिने तिचा मेकअप पूर्णपणे अमिताभ बच्चन यांच्यासारखाच केला होता. या अभिनेत्रीचा मेकअप इतका सुंदर करण्यात आला होता की, ही अभिनेत्री कोण आहे हे कोणालाच कळत नव्हते. फराह खान सोबत नाचतानाचा हा फोटो पाहून तुम्हाला तरी ही अभिनेत्री कोण आहे हे कळत आहे का? ही अभिनेत्री कोण आहे हे कळल्यानंतर तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसणार आहे. 
फराहसोबत नाचत असणारी ही अभिनेत्री दुसरी कोणीही नसून शिल्पा शेट्टी आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटले ना.... शिल्पा ही अमिताभ बच्चन यांची खूप मोठी फॅन आहे आणि त्यामुळे तिने लिप सिंग बॅटल या कार्यक्रमातील तिचे नृत्य त्यांना समर्पित करण्याचे ठरवले आणि तिने हम या त्यांच्या चित्रपटातील जुम्मा चुम्मा दे दे या गाण्यावर परफॉर्मन्स सादर केला. या परफॉर्मन्समध्ये तिला फराह खानने साथ दिली. हा परफॉर्मन्स पाहाताना अमिताभ यांच्या गाण्यावर नृत्य करणारी शिल्पा आहे हे कोणालाच कळत नव्हते. तिने या गाण्यावर खूप चांगले नृत्य सादर केले.
शिल्पासोबतच या कार्यक्रमात रितेश देशमुखने देखील हजेरी लावली होती. लिप सिंग बॅटल हा कार्यक्रम लिप सिंग बॅटल या पाश्चिमात्य कार्यक्रमावर आधारित असून या कार्यक्रमाची फराह खान ही सर्वस्व असून अली असगर तिला या कार्यक्रमात साथ देत आहे. प्रेक्षकांना हा भाग लवकरच पाहाता येणार आहे. 

Also Read : माझ्यासाठी फॅमिली कम्स फर्स्ट : फराह खान

Web Title: Who is the first Bollywood Bollywood actress to dance with Farah Khan?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.