n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;">इश्क का रंग सफेद या कार्यक्रमाला प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळाली होती. पण नंतरच्या काळात या कार्यक्रमाचा टिआरपी ढासळत गेला. काही दिवसांपूर्वी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या इशा सिंगने या मालिकेला रामराम ठोकला. त्यानंतर या मालिकेत विप्लवच्या भूमिकेत असलेल्या मिशाल रहेजाने अचानक पैसे वाढवून मागितले या सगळ्यात बातम्या मीडियात चांगल्याच गाजल्या होत्या. या मालिकेचा वेळही काही दिवसांपूर्वी बदलण्यात आला होता. या सगळ्यामुळे हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार अशी चर्चा होती. पण हा कार्यक्रम संपणार नसून या कार्यक्रमाला सहा महिन्याचाी मुदतवाढ मिळालेली आहे. या कार्यक्रमाच्या कथानकात सध्या खूप बदल करण्यात आलेले आहेत. हे बदल तरी या कार्यक्रमाला टिआरपी रेसमध्ये ठेवण्यात मदत करतील अशी आशा ठेवायला हरकत नाही.