जेव्हा आयत अवतरली सेटवर !
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2016 12:57 IST2016-09-16T07:24:24+5:302016-09-16T12:57:49+5:30
'द वॅाईस इंडिया किडस' या रिअॅलिटी शोमध्ये छोटीशी आयतने तिच्या गाण्याणे तिन्ही जजेजसची मनं जिंकली होती. खास करून जेव्हा ...

जेव्हा आयत अवतरली सेटवर !
' ;द वॅाईस इंडिया किडस' या रिअॅलिटी शोमध्ये छोटीशी आयतने तिच्या गाण्याणे तिन्ही जजेजसची मनं जिंकली होती. खास करून जेव्हा आयतने ब्लाईंड ऑडिशनमध्ये लता दिदींचे ''तुमसे मिली नजर.....'' हे गाणं परफॅार्म केले तेव्हापासून आयतने तमाम रसिकांच्या मनावरही गारूड घालायला सुरूवात केली. मात्र पुढच्या राऊंडमध्ये आयत स्पर्धेतून बाहेर पडली. त्यानंतर शान,नीती आणि शेखर हे आयतला खूप मिसही करत होते.सतत दोन महिने आयत या शोच्या निमित्ताने तिन्ही जजेसच्या संपर्कात असल्यामुळे तिचे तिन्ही जजेसमध्ये चांगले बाँडींग निर्माण झाले होते. त्यामुळेच जेव्हा आयत जजसेना भेटायला शोच्या सेटवर आली तेव्हा तिला बघून सारेच खुष झाले. खास करून सगळ्या स्पर्धकांमध्ये आयत लहान असल्यामुळे सुरूवाती पासूनच आयत नीतीची आवडती स्पर्धक होती. जेव्हा ती सा-यांना भेटली तेव्हा नीतीने खास आयतसाठी ''तेरा मुझसे है पेहले का नाता कोई.....'' हे गाणंही गायलं. आयतच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देत तिघेही नेहमी तिच्या पाठीशी असतील असा विश्वासही जजेसनी यावेळी आयतला दिलाय.