राजीव मेहता जेव्हा अजिंक्य रहाणेला भेटतो तेव्हा.....!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2018 04:54 AM2018-05-07T04:54:35+5:302018-05-07T10:24:35+5:30

‘स्टार प्लस’वरील ‘खिचडी’ या विनोदी मालिकेत प्रफुलची भूमिका रंगविणारा अभिनेता राजीव मेहता नुकताच दिल्लीत एका आयपीएल क्रिकेट सामन्यात (राजस्थान ...

When Rajiv Mehta meets Ajinkya Rahane .....! | राजीव मेहता जेव्हा अजिंक्य रहाणेला भेटतो तेव्हा.....!

राजीव मेहता जेव्हा अजिंक्य रहाणेला भेटतो तेव्हा.....!

googlenewsNext
्टार प्लस’वरील ‘खिचडी’ या विनोदी मालिकेत प्रफुलची भूमिका रंगविणारा अभिनेता राजीव मेहता नुकताच दिल्लीत एका आयपीएल क्रिकेट सामन्यात (राजस्थान रॉयल्स विरुध्द दिल्ली डेअरडेव्हिल्स) दिसला होता. 'राजस्थान रॉयल्स' हा राजीवचा आवडता संघ असून तो त्या संघाला उत्तेजन देत होता.राजीव हा क्रिकेटचा विलक्षण चाहता असल्याने त्याला हा सामना प्रत्यक्ष मैदानात पाहता येत असल्याने तो खूपच खुष होता.पण सामन्यानंतर त्याच्या संघाचा कर्णधार क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे याला ‘स्टार प्लस’ वाहिनीकडून ‘नई सोच’ हा चषक त्याच्या हातून बहाल करण्यात आल्यावर तर राजीवच्या आनंदाला पारावारच राहिला नाही.राजीव म्हणतो,“लहान असल्यापासूनच क्रिकेट हा माझा अतिशय आवडीचा क्रीडा प्रकार असून आता आयपीएल स्पर्धा
ही माझी अत्यंत आवडीची क्रिकेट स्पर्धा बनली आहे.अजिंक्य रहाणे हा माझा अतिशय आवडता खेळाडू असून त्याची अपारंपरिक शैली मला फार आवडते. त्याला माझ्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला,ही माझ्या दृष्टीने अत्यंत आनंदाची गोष्ट आहे.आपल्याला नव्या स्वरूपातील 'खिचडी' मालिका अतिशय आवडते आणि त्यातील प्रफुलची (माझी) व्यक्तिरेखा आपल्या सर्वाधिक आवडीची आहे,असे त्याने मला सांगितल्यावर तर मी बेहद्द खुश झालो.भावी वाटचालीसाठी आम्ही दोघांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.ही नक्कीच एक अविस्मरणीय संध्याकाळ होती.”

'खिचडी' मालिकेचे पुनरागमन झाले असल्यामुळे प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या व्यक्तिरेखा छोट्‌या पडद्यावर पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. अभिनेत्री सुप्रिया पाठक या शोमध्ये हंसाची भूमिका साकारत असून त्यांना ही व्यक्तिरेखा फार आवडते असे नुकतेच एका मुलाखतीमध्ये सांगितले. त्या सांगतात, “हंसा ही एक अशी व्यक्तिरेखा आहे जी कायमच सदाबहार राहील.आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या भयानक गोष्टींपासून अनभिज्ञ अशी ती सदैव आनंदात असते. त्यामुळे जेव्हा मला कामाचा कंटाळा येतो तेव्हा मीसुद्धा हंसासारखीच होते.”'खिचडी' ही मालिका २००२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. या मालिकेने जवळजवळ दोन वर्षं प्रेक्षकांचे मनोरंजन केले. ही मालिका संपल्यानंतर २००५ मध्ये याच मालिकेची संपूर्ण टीम घेऊन निर्माते जे.डी.मजेठिया आणि आतिश कपाडिया यांनी इन्स्टंट खिचडी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आणली होती. आहेत.'खिचडी' या मालिकेत आपल्याला पारेख कुटुंबात घडत असलेली धमाल मस्ती पाहायला मिळाली होती.या कुटुंबातील हंसा आणि प्रफुल्ल यांची जोडी तर प्रेक्षकांना प्रचंड भावली होती.'खिचडी'चा नवा सिझन नुकताच सुरू झाला असून या सिझनला देखील प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे.   

Web Title: When Rajiv Mehta meets Ajinkya Rahane .....!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.