क्या कसूर है अमला का? मालिका कानमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2017 16:16 IST2017-04-18T10:46:25+5:302017-04-18T16:16:25+5:30
क्या कसूर है अमला का ही मालिका प्रेक्षकांचे सध्या चांगलेच मन जिंकत आहे. ही मालिका फातमागुल या टर्किश शोवर ...
.jpg)
क्या कसूर है अमला का? मालिका कानमध्ये
क या कसूर है अमला का ही मालिका प्रेक्षकांचे सध्या चांगलेच मन जिंकत आहे. ही मालिका फातमागुल या टर्किश शोवर आधारित आहे. या मालिकेत साध्याभोळ्या अमलाचे आयुष्य प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. आजही आपल्या समाजात लैंगिक अत्याचार झालेल्या स्त्रीला स्वीकारले जात नाही याच गोष्टीवर भाष्य करणारी ही मालिका असून या मालिकेचे सध्या चांगलेच कौतुक केले जात आहे. या मालिकेत पंखुरी अवस्थी प्रमुख भूमिकेत आहे. या मालिकेच्या काही भागांचे चित्रीकरण काही दिवसांपूर्वी धरमशालामध्ये करण्यात आले.
फ्रान्समधील कान शहरात इच्चो राइटस मिप टिव्ही हा एक फेस्टिव्हल होतो. या फेस्टिव्हलमध्ये क्या कसूर है अमला का ही मालिका नुकतीच सादर करण्यात आली. फ्रान्समधील एका शहरात या मालिकेचे सादरीकरण करणे हे या मालिकेच्या निर्मात्यांसाठी खूप मोठे यश संपादन केल्यासारखे आहे. दर्जेदार चित्रपट, टिव्ही कार्यक्रम तसेच नाटके यांची दखल घेऊन त्यांना जागतिक प्रसिद्धी देण्याबद्दल कान शहराची ख्याती आहे. अशा या शहरात क्या कसूर है अमला का या मालिकेचे सादरीकरण करण्यात आले. या फेस्टिव्हलमध्ये आपली मालिका सादर करण्यासाठी जगभरातील अनेक निर्माते, दिग्दर्शक उत्सुक होते आणि त्यासाठी त्यांनी आपल्या मालिका आणि कार्यक्रमांची नोंददेखील केली होती. पण या सगळ्यातून क्या कसूर है अमला का या कार्यक्रमाने बाजी मारली. या मालिकेतील कलाकार, या मालिकेची कथा, दर्जेदार दिग्दर्शन यामुळे या मालिकेची निवड करण्यात आली. या संदर्भात या मालिकेचे निर्माते सांगतात, जगभरातील अनेक मालिकांमधून क्या कसूर है अमला का या मालिकेची इच्चो राइटस मिप टिव्हीसारख्या प्रतिष्ठेच्या फेस्टिव्हलमध्ये निवड करण्यात आली हा आमचा एक प्रकारे गौरवच आहे.