तुमच्यासाठी काय पनमध्ये राधा प्रेम रंगी रंगलीच्या कलाकारांनी केली मजा-मस्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2018 11:18 IST2018-01-03T05:48:55+5:302018-01-03T11:18:55+5:30

कलर्स मराठीवरील तुमच्यासाठी काय पन कार्यक्रमाच्या गाजावाजा जंक्शनवर दर आठवड्यामध्ये वेगवेगळे कलाकार हजेरी लावत असतात. या आठवड्यामध्ये कलर्स मराठीवरील ...

What's the fun for you to do with Radha Prem Rangi Rangali artists fun? | तुमच्यासाठी काय पनमध्ये राधा प्रेम रंगी रंगलीच्या कलाकारांनी केली मजा-मस्ती

तुमच्यासाठी काय पनमध्ये राधा प्रेम रंगी रंगलीच्या कलाकारांनी केली मजा-मस्ती

र्स मराठीवरील तुमच्यासाठी काय पन कार्यक्रमाच्या गाजावाजा जंक्शनवर दर आठवड्यामध्ये वेगवेगळे कलाकार हजेरी लावत असतात. या आठवड्यामध्ये कलर्स मराठीवरील “राधा प्रेम रंगी रंगली” या मालिकेतील कलाकार हजेरी लावणार आहेत आणि ते बरीच धमाल मस्ती करणार आहेत. या मंचावर या कलाकारांचा एक वेगळाच अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सचित पाटील म्हणजेच तुमचा लाडका प्रेम, वीणा जगताप म्हणजेच राधा देशमुख, कविता लाड म्हणजेच माधुरी देशमुख, शैलेष दातार, अन्विता - म्हणजेच अक्षया गुरव आणि मालिकेमधील बाकी कलाकार देखील कार्यक्रमामध्ये बरीच धम्माल मस्ती करताना दिसणार आहेत. तसेच या मंचावर महाराष्ट्राचे लाडके आणि अमाप लोकप्रियता मिळवलेले विनोदवीर एका पेक्षा एक स्कीट सादर करून सगळ्यांनाच हसवणार आहेत. 
भागाची सुरुवात रॅम्प वॉकने होणार असून यामध्ये कलाकार आपापल्या अंदाजामध्ये वॉक करणार आहेत. याचबरोबर भागामध्ये विनोदवीर तुफान विनोदी स्कीटस सादर करून पाहुण्यांना पोट धरून हसण्यास भाग पाडणार आहेत आणि उपस्थित कलाकारांबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे गेम देखील खेळणार आहेत. ७०० करोडचा व्यवसाय सांभाळणाऱ्या देशमुख घरातील गृहलक्ष्मींना स्वयंपाक घरातील लहान कामं करता येतात का हे बघण्यासाठी संदीप पाठक काही मजेदार गेम खेळण्याचे आव्हान या महिलांना देणार आहे आणि हे कलाकार हे आव्हान स्वीकारणार देखील आहेत. कविता लाड म्हणजेच मालिकेतील प्रेमची आई, अपर्णा अपराजित म्हणजेच राधाची आई, दीपिका म्हणजे अर्चना निपाणकर, आजी म्हणजेच विद्या करंजीकर आणि मालिकेतील दीपिकाची आई म्हणजेच लेखा मुकुंद यांमध्ये मोदक बनविण्यची स्पर्धा रंगणार आहे आणि यामध्ये विद्या करंजीकर विजेत्या ठरणार आहेत. तसेच राधा, अन्विता आणि अर्चना या तिघींमध्ये मोतीचुरचे लाडू वळण्याची स्पर्धा रंगणार असून आपल्या सगळ्यांची लाडकी वीणा जगताप यात जिंकणार आहे. 
या गेम्सनंतर निरंजन नामजोशीचा एक वेगळा पैलू प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्याने या मालिकेतील त्याच्या बायकोसाठी म्हणजे अन्वितासाठी या कार्यक्रमात गिटार देखील वाजवली आहे. तसेच अर्चनाने कैसी हे ये पहेली हे गाणे सादर केले. एकूणच हा भाग खूप रंगतदार आणि धमाल झाला आहे यात काही शंका नाही. 

Also Read : संदीप पाठक सांगतोय २०१७ ठरले माझ्यासाठी खास

Web Title: What's the fun for you to do with Radha Prem Rangi Rangali artists fun?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.