एक दुजे के वास्तेचे काय होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2016 17:18 IST2016-09-29T11:48:38+5:302016-09-29T17:18:38+5:30
एक दुजे के वास्ते हा कार्यक्रम सात ऑक्टोबरला प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या बातमीमुळे या मालिकेच्या फॅन्सना चांगलाच धक्का ...
.jpg)
एक दुजे के वास्तेचे काय होणार?
ए दुजे के वास्ते हा कार्यक्रम सात ऑक्टोबरला प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या बातमीमुळे या मालिकेच्या फॅन्सना चांगलाच धक्का बसला आहे. ही मालिका सुरू होऊन काहीच महिने झाले आहेत. या मालिकेतील श्रवण आणि सुमनची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडते. पण निकिता दत्ता आणि नमिक पॉल या दोघांनाही कित्येक दिवसांपासून ताप असल्याने ते दोघेही मालिकेचे चित्रीकरण करू शकत नाहीत. त्यामुळे ही मालिका बंद करण्याचा निर्मात्यांनी निर्णय घेतला आहे. पण या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेऊ नये असे या मालिकेच्या फॅन्सचे म्हणणे आहे. मालिका संपू नये यासाठी अनेक फॅन्सचे मेल्स, मेसेजेस येत आहेत. पण अद्याप वाहिनी आणि निर्माते आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे म्हटले जात आहे.