​साराभाई व्हर्सेस साराभाईचे नवे नाव काय असणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2017 16:21 IST2017-04-19T10:51:49+5:302017-04-19T16:21:49+5:30

साराभाई व्हर्सेस साराभाई ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत होती. या मालिकेने प्रेक्षकांच्या हृदयावर अनेक वर्षं राज्य केले होते. या ...

What will be the name of Sarabhai Varsus Sarabhai? | ​साराभाई व्हर्सेस साराभाईचे नवे नाव काय असणार?

​साराभाई व्हर्सेस साराभाईचे नवे नाव काय असणार?

राभाई व्हर्सेस साराभाई ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत होती. या मालिकेने प्रेक्षकांच्या हृदयावर अनेक वर्षं राज्य केले होते. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या लाडक्या होत्या. त्यामुळे या मालिकेचा दुसरा सिझन केव्हा येणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. या मालिकेचे निर्माते जे.डी.मजेठिया यांना नेहमीच या मालिकेच्या दुसऱ्या सिझनबाबत विचारण्यात येत असे. पण सगळ्या कलाकारांना पुन्हा एकत्र आणणे अशक्य असल्याचे त्यांचे म्हणणे होते. पण काही महिन्यांपूर्वी या मालिकेच्या कलाकारांनी रियुनियन केले आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. या फोटोंमुळे आता हे सगळे एकत्र येणार याची खात्री प्रेक्षकांना पटली होती.
या मालिकेचा नवा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून ही मालिका टिव्हीवर नव्हे तर वेबसिरिजच्या रूपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेचा पहिला प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला. या पहिल्या प्रोमोमध्ये प्रेक्षकांना सतिश शहा, रत्ना पाठक शहा, सुमीत राघवन, मौली गांगुली, राजेश कुमार, देवेन भोजानी यांना पाहायला मिळाले. या सगळ्यांमध्ये एक वाद सुरू असल्याचे आपल्याला या प्रोमोत दिसत होते. साराभाई व्हर्सेस साराभाई या मालिकेच्या दुसऱ्या सिझनचे नाव काय ठेवायचे यावरून त्यांच्यात सुरुवातीला केवळ चर्चा सुरू होती. पण हळूहळू करत या चर्चेचे वादात रूपांतर झाले आणि शेवटी या मालिकेत साहिलची भूमिका साकारणाऱ्या सुमीत राघवनने प्रेक्षकांशी संवाद साधला आणि मालिकेचे नाव तुम्हीच सुचवा असे प्रेक्षकांना आवाहन केले. या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये प्रेक्षकांनी या कार्यक्रमासाठी नवीन नावे सुचवावी असे त्याने सांगितले. त्यामुळे या मालिकेच्या दुसऱ्या सिझनचे नाव काय असणार हे प्रेक्षकच ठरवणार आहेत.  

Web Title: What will be the name of Sarabhai Varsus Sarabhai?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.