ये रिश्ता क्या कहलाता है फेम हिना खानचा हॉट अवतार तुम्ही पाहिला का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2017 13:00 IST2017-03-07T07:30:42+5:302017-03-07T13:00:42+5:30
हिना खान ने ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत अक्षरा ही प्रमुख भूमिका साकारली होती. हिनाला तिच्या पहिल्याच ...

ये रिश्ता क्या कहलाता है फेम हिना खानचा हॉट अवतार तुम्ही पाहिला का?
ref="http://cnxmasti.lokmat.com/television/hot-gossip/yeh-rishta-kya-kehlata-hai-trp-boosted-after-lead-pair-karan-mehra-hina-khans-exit-producer-rajan-shahi/16801">हिना खानने ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत अक्षरा ही प्रमुख भूमिका साकारली होती. हिनाला तिच्या पहिल्याच मालिकेत प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. या मालिकेमुळे तिला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम तर मिळाले. पण त्याचसोबत या मालिकेने तिला अनेक पुरस्कारदेखील मिळवून दिले. सेक्सिएस्ट एशियन वुमनच्या यादीतही 2013 आणि 2014मध्ये तिने स्थान पटकावले.
ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेचा ती जवळजवळ आठ वर्षं भाग होती. तिने या मालिकेला नुकताच रामराम ठोकला. हिनाने ही मालिका सोडल्यापासून तिला अनेक चित्रपटांच्या आणि मालिकांच्या ऑफर्स येत आहेत. ती लवकरच एका नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची चर्चा आहे.
![hina khan]()
हिना प्रेक्षकांची प्रचंड लाडकी असल्याने तिने आपल्या मालिकेत, चित्रपटत काम करावे अशी अनेक निर्मात्यांची इच्छा आहे आणि त्यामुळे तिला अनेक ऑफर्स येत आहेत. पण हिना घाई न करता विचारपूर्वक सगळ्या स्क्रिप्ट वाचत आहे. चांगली कथा असल्याशिवाय काम करायचे नाही असे तिने ठरवले आहे. याविषयी हिना सांगते, "मला चित्रपटांच्या आणि मालिकांच्या अनेक ऑफर्स येत आहेत हे खरे आहे. पण मी योग्य कथेची वाट पाहात आहे. जी कथा माझ्या हृदयाला भिडेल आणि ज्यामुळे प्रेक्षकांचे मनोरंजन होईल अशाच चित्रपटात, मालिकेत काम करायचे असे मी ठरवले आहे. सध्या मी अनेक स्क्रिप्ट वाचत असून स्वतःसाठी अधिकाधिक वेळ देत आहे. माझ्या फॅन्सने आजवर मला दिलेल्या प्रेमासाठी मी त्यांची आभारी आहे. मी लवकरच माझ्या फॅन्ससाठी एका चांगल्या भूमिकेद्वारे कमबॅक करेन."
![hina khan]()
हिना लवकरच प्रेक्षकांना एका ग्लॅमरस लूकमध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे.