​ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतील शिवांगी जोशीच्या आईने केली मालिकेच्या टीमला मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2017 10:57 IST2017-02-25T05:27:51+5:302017-02-25T10:57:51+5:30

ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत नैरा म्हणजेच शिवांगी जोशीचे लग्न होणार असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. या ...

What is this relation called, Shivangi Joshi's mother in the series helped the Team of the series | ​ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतील शिवांगी जोशीच्या आईने केली मालिकेच्या टीमला मदत

​ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतील शिवांगी जोशीच्या आईने केली मालिकेच्या टीमला मदत

रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत नैरा म्हणजेच शिवांगी जोशीचे लग्न होणार असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. या मालिकेत कार्तिक म्हणजेच मोहसिन खानसोबत तिचे लग्न होणार आहे. शिवांगी आणि मोहसिन खऱ्या आय़ुष्यातही एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. मालिकेत सध्या या दोघांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. लग्नाच्या तयारीत कोणतीही कमतरता पडू नये यासाठी मालिकेची टीम प्रयत्न करत आहे. या दोघांचे लग्न राजस्थानी पद्धतीने होणार असून या लग्नाचे चित्रीकरण खास बिकानेरमध्ये होणार आहे. या मालिकेची टीम चित्रीकरणासाठी लवकरच बिकानेरला रवाना होणार आहे. याआधी या दोघांच्या हळदी समारंभाच्या दृश्याचे चित्रीकरण नुकतेच करण्यात आले. यावेळी शिवांगी जोशीची आई या हळदी समारंभाच्या चित्रीकरणाला जातीने उपस्थित होती. ती या मालिकेच्या टीममधील मंडळींना या दृश्याच्या चित्रीकरणाची तयारी करण्यासाठी मदत करत होती. हे सगळे पाहून शिवानी खूपच इमोशनल झाली होती. याविषयी शिवांगी सांगते, "माझी आई अनेकवेळा ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेच्या सेटवर माझ्यासोबत असते. तिला माझ्यासोबत सेटवर राहायला खूप आवडते. मालिकेत आता माझे लग्न दाखवले जाणार आहे ही गोष्ट तिला कळल्यापासून तर ती सतत सेटवर माझ्यासोबत येते आणि अनेकवेळा मालिकेच्या टीमला चित्रीकरणाच्या तयारीसाठी मदत करत असते. काही दिवसांपूर्वी माझ्या हळदी समारंभाचे चित्रीकरण करण्यात आले. त्यावेळी मला जी हळद लावण्यात आली होती, ती हळद तिने स्वतः तयार केली होती. मला तर सुरुवातीला ही गोष्ट माहीतच नव्हती. पण हे मला कळल्यानंतर मला आश्चर्यांचा धक्का बसला. ती या दृश्याचे चित्रीकरण करत असताना खूपच खूश होती."  





Web Title: What is this relation called, Shivangi Joshi's mother in the series helped the Team of the series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.