​ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेच्या सेटवर अवतरला बिबट्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2017 15:11 IST2017-02-21T09:41:13+5:302017-02-21T15:11:13+5:30

ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेच्या सेटवर नुकताच एक बिबट्या पाहायला मिळाला. बिबट्याला पाहाताच सेटवरील सगळेच प्रचंड घाबरले ...

What is this relation called the leopard on the set of the series? | ​ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेच्या सेटवर अवतरला बिबट्या

​ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेच्या सेटवर अवतरला बिबट्या

रिश्ता क्या कहलाता है या मालिकेच्या सेटवर नुकताच एक बिबट्या पाहायला मिळाला. बिबट्याला पाहाताच सेटवरील सगळेच प्रचंड घाबरले होते. या मालिकेतील एका रोमँटिक दृश्याचे चित्रीकरण सुरू असताना अचानक बिबट्या मालिकेच्या सेटवर अवतरला. 
ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेचे चित्रीकरण नुकतेच फिल्म सिटीमध्ये सुरू होते. या मालिकेत आता प्रेक्षकांना कार्तिक आणि नैराचे लग्न पाहायला मिळणार आहे. हळदीच्या आधीच्या रात्रीचे चित्रीकरण नुकतेच सुरू होते. कार्तिक आणि नैरा यांना लग्नाच्याआधी एकदा एकमेकांना भेटायची इच्छा असल्याने ते भेटण्यासाठी संधी शोधत असल्याचे दाखवण्यात येणार होते. त्यावेळी एका गाण्याचे चित्रीकरण सुरू असताना अचानक बिबट्या सेटवर आला. खरे तर बिबट्या आल्याचे सेटवरील अनेकांच्या लक्षातच आले नाही. पण ही गोष्ट लगेचच दिग्दर्शकाच्या लक्षात आली आणि त्यांनी सगळ्यांना याविषयी सांगून प्रत्येकाला आपापल्या ठिकाणी थांबायला सांगितले. आपल्या सुरक्षिततेसाठी धावपळ न करता एकाच ठिकाणी थांबा अशी सूचना दिग्दर्शकांने सगळ्यांना दिली. तोपर्यंत बिबट्या अगदी जवळ आला होता. बिबट्या एकदम जवळ आल्याने सगळ्यांना काय करायचे हेच कळत नव्हते. पण काहीच वेळात तो स्वतःहून तिथून निघून गेला. याबद्दल कार्तिकची भूमिका साकारणारा मोहसिन खान सांगतो, "मी नैरासोबत एक रोमँटिक दृश्याचे चित्रीकरण करत होतो आणि त्यासाठी मी माझ्या गुडघ्यांवर बसलो होते. चित्रीकरणादरम्यान माझी आणि शिवांगीची मजामस्ती सुरू होती. पण तेवढ्यात आमच्या व्हॅनिटी व्हॅनच्या जवळ बिबट्या दिसल्याचे मला कळले. त्यामुळे आम्ही सगळेच घाबरलो. रात्रभर आम्ही घाबरतच चित्रीकरण केले. त्या रात्री कुठेही बाहेर जाताना आम्ही अनेक जणांच्या ग्रुपनेच जात होतो." 

Web Title: What is this relation called the leopard on the set of the series?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.