सध्या काय करतेय 'ससुराल गेंदा फूल' फेम अभिनेत्री रागिनी खन्ना?, सिनेइंडस्ट्रीतून अभिनेत्री आहे गायब
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2023 17:53 IST2023-08-22T17:52:43+5:302023-08-22T17:53:21+5:30
Ragini Khanna : ससुराल गेंदा फूल या मालिकेतून घराघरात आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री रागिनी खन्ना सध्या गायब आहे.

सध्या काय करतेय 'ससुराल गेंदा फूल' फेम अभिनेत्री रागिनी खन्ना?, सिनेइंडस्ट्रीतून अभिनेत्री आहे गायब
२०१० ते २०१२ पर्यंत, स्टार प्लस मालिका ससुराल गेंदा फूल मालिका खूप लोकप्रिय झाली. यामध्ये सुहाना कश्यपची भूमिका करणाऱ्या रागिनी खन्ना(Ragini Khanna)ला घराघरात ओळख मिळाली आहे. आजही लोक तिला सुहानाच्या नावाने ओळखतात. अभिनेत्री गेल्या काही दिवसांपासून सिनेइंडस्ट्रीतून गायब आहे. रागिणी आजकाल काय करतेय हे जाणून घेऊयात...
रागिणी खन्नाने अनेक रिअॅलिटी शो होस्ट केले. काहींमध्ये ती स्पर्धक म्हणून दिसली. त्यांनी चित्रपटांमध्येही भरपूर काम केले. पण आता बऱ्याच दिवसांपासून ती पडद्यावरून गायब आहे. अभिनेत्री सीरियलमध्ये काम करण्यासोबतच तिने मॉडेल, कॉमेडियन, टीव्ही होस्ट म्हणूनही आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर चाहत्यांशी जोडलेली असते. यावरून रागिणी कुटुंबासोबत काही वेळ घालवत असल्याचे समजते आहे. रागिनी खन्नाच्या आई-वडिलांचे नाव प्रवीण खन्ना आणि कामिनी खन्ना आहे. अभिनेत्रीच्या भावाचे नाव अमित खन्ना आहे, तो देखील एक अभिनेता आहे. 'ये दिल चाहे मोर' या चित्रपटात त्याने काम केले.
अभिनेत्रीची आई लेखिका, अँकर आणि ब्युटी विथ अॅस्ट्रॉलॉजीच्या संस्थापिका आहेत. तर रागिणीच्या वडिलांचे ऑक्टोबर २०१५ मध्ये निधन झाले. रागिना खन्ना आणि कृष्णा अभिषेक चुलत भाऊ आहेत. आरती सिंग आणि सौम्या सेठ या त्याच्या चुलत बहिणी आहेत.मिडिया रिपोर्ट्सनुसार, सध्या अभिनेत्री छोट्या पडद्यावर नव्हे तर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे.