असं काय घडलं होतं की 'वीण दोघातली ही तुटेना'च्या प्रोमो शूटदरम्यान तेजश्रीची उडालेली झोप, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 13:21 IST2025-07-31T13:21:11+5:302025-07-31T13:21:56+5:30

Tejashree Pradhan : तेजश्री प्रधान झी मराठी वाहिनीवरील 'वीण दोघातली ही तुटेना' मालिकेत पाहायला मिळणार आहे. नुकतेच तिने या मालिकेतील प्रोमो शूटदरम्यानचा अनुभव शेअर केला आहे.

What happened that Tejashree Pradhan fell asleep during the promo shoot of 'Veen Doghatali Hi Tutena', she said... | असं काय घडलं होतं की 'वीण दोघातली ही तुटेना'च्या प्रोमो शूटदरम्यान तेजश्रीची उडालेली झोप, म्हणाली...

असं काय घडलं होतं की 'वीण दोघातली ही तुटेना'च्या प्रोमो शूटदरम्यान तेजश्रीची उडालेली झोप, म्हणाली...

तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. अलिकडेच तेजश्री 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत पाहायला मिळाली होती. मात्र तिने अचानक या मालिकेतून एक्झिट घेतली. त्यानंतर आता ती झी मराठी वाहिनीवरील 'वीण दोघातली ही तुटेना' (Veen Doghatali Tutena) मालिकेत पाहायला मिळणार आहे. नुकतेच तिने या मालिकेतील प्रोमो शूटदरम्यानचा अनुभव शेअर केला आहे.

वीण दोघातली ही तुटेना या मालिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधान स्वानंदीच्या भूमिकेत दिसणार आहे. मालिकेच्या प्रोमो शूटदरम्यान तिला आलेला अनुभव आणि भूमिकेबद्दल सांगितले. ती म्हणाली की, "मी स्वानंदीच्या भूमिकेतून प्रेक्षकांना भेटणार आहे. स्वानंदी ही एक परिपक्व व्यक्तिरेखा आहे आणि ती परिस्थिती देखील परिपक्वतेने हाताळते. टीम खूप छान बनली आहे. सहकलाकार ही मस्त आहेत त्यामुळे मालिकेचा प्रवास हा मजेशीर असणार आहे. या भूमिकेसाठी जेव्हा कॉल आला तेव्हा आनंदच झाला कारण कॉल करणारी माणसं आपली होती आणि नाही म्हणावं असं काही कारणच दिसलं नाही, टीम छान आहे, मालिकेचा विषय गोड आहे आणि पूर्वीची काही माणसं देखील एकत्र आली आहेत. 'होणार सून मी या घरची' या मालिकेतील कॅमेरा मागची काही तंत्रज्ञ टीम यात ही आहे. झी मराठीच्या माध्यमातून प्रेक्षकांशी खूप छान नातं निर्माण झालं आहे." 

तेजश्रीची उडालेली झोप

ती पुढे म्हणाली की, "जेव्हा प्रोमो आला तेव्हा त्यांच्या प्रेमाचा विश्वास होता की प्रोमो आवडेल आणि त्यांनी उदंड प्रेम दिलं. सुबोध दादासोबत काम करायला मिळत आहे याचा ही आनंद आहे. जेव्हा आमचा दुसरा प्रोमो आला त्याला ही छान प्रतिसाद मिळाला आणि मला त्या प्रोमो मागचा एक किस्सा सांगावासा वाटतो. एक शॉट आहे जिथे स्वानंदीच्या ताटात गुलाबजामून आहे, तो शॉट आम्ही रात्री २ वाजता शूट केला आहे. शूटिंगमध्ये एक शॉट खूप वेगळ्या अँगल्सने शूट केला जातो आणि रात्री २ वाजता गुलाब जामून खायचा या विचारांनीच मला टेंशन आलं, माझी झोप उडाली होती. आम्ही त्या सीनसाठी एकूण ७ -८ गुलाबजामूनचा वापर केला. त्याच प्रोमोच्यावेळी संपूर्ण टीम पहिल्यांदा भेटली. मी शेवटी हेच म्हणेन की प्रेक्षकांना एक चांगली मालिका देण्याचा प्रयत्न असणार आहे."  'वीण दोघातली ही तुटेना' ११ ऑगस्ट पासून दररोज संध्याकाळी ७:३० वाजता झी मराठीवर पाहायला मिळेल.

Web Title: What happened that Tejashree Pradhan fell asleep during the promo shoot of 'Veen Doghatali Hi Tutena', she said...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.