'व्हॉइस इंडिया किड्स'च्या सेटवर लुलियाने सलमान खानविषयी केला हा खुलासा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2018 17:32 IST2018-02-01T12:02:10+5:302018-02-01T17:32:14+5:30

छोट्या पडद्यावरचा संगीतावर आधारित रिअॅलिटी शो,व्हॉइस इंडिया किड्स अवाक् करणारी प्रतिभा आणि अनोखे विषय यांच्या जोरावर प्रत्येक वीकेंडला प्रेक्षकांचे ...

What is the disclosure of Lolia about Salman Khan on the set of 'Voice India Kids'? | 'व्हॉइस इंडिया किड्स'च्या सेटवर लुलियाने सलमान खानविषयी केला हा खुलासा?

'व्हॉइस इंडिया किड्स'च्या सेटवर लुलियाने सलमान खानविषयी केला हा खुलासा?

ट्या पडद्यावरचा संगीतावर आधारित रिअॅलिटी शो,व्हॉइस इंडिया किड्स अवाक् करणारी प्रतिभा आणि अनोखे विषय यांच्या जोरावर प्रत्येक वीकेंडला प्रेक्षकांचे सातत्याने मनोरंजन करत आला आहे.आगामी भागांमध्ये लग्न हा विषय घेण्यात आला असून हे भाग आणखी मनोरंजक करण्यासाठी काही खास पाहुणे येणार आहेत. सलमान खानची गर्लफ्रेंड लुलिया व्हँतुर आणि मनीष पॉल शोमध्ये हजेरी लावणार आहेतच, पण या भागाला फोडणी मिळणार आहे ती व्हॉइस इंडिया किड्सच्या सेटवर लुलियासाठी आखण्यात आलेल्या स्वयंवरामुळे. आता संपूर्ण देशाला उत्सुकता लागली आहे ती सलमान खानची निवड करते की काय याची. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,जय लुलियाला स्टेजवर बोलावतो आणि विचारतो की, तिला रोमानियातील मुलगा हवा आहे की भारतातील. उत्तरादाखल ती म्हणते- आता मी भारतात आहे, यावरून तुला काय वाटते? मग तिला ज्याच्याशी लग्न करायचे आहे त्याचे वर्णन करायला जय तिला सांगतो. लुलिया म्हणते की ती चांगली दाढी असलेल्या कोणाच्या तरी शोधात आहे.
लवकरच,जय तिच्यासाठी स्टेजवर तीन कट आउट्स आणतो आणि तिच्या हातात एक हार देतो.एकामागोमाग एक तो ती कट आउट्स दाखवतो. ती असतात सलमान खान, रणवीर सिंग आणि रणबीर कपूर यांची. शेवटी तो अखेरच्या कट आउटच्या शेजारी उभा राहून स्वत:कडे चौथा पर्याय म्हणून निर्देश करतो.लुलिया सलमान खानसकट सर्वांना नाकारून जयला तिचा नवरा म्हणून स्वीकारत त्याच्याकडे धावते.ही परिस्थिती बघून जय तिला विचारतो की तो तेथे नसता, तर तिने कोणाची निवड केली असती? यावर लुलिया त्याला अर्ध्यातच थांबवत म्हणते, “मी तुझी निवड केलेली असल्याने तुझ्यासाठी माझ्याकडे काहीतरी आहे” आणि ती सलमान खानचे प्रसिद्ध गाणे ‘मै हुँ हिरो तेरा’ त्याच्यासाठी म्हणते.


बॅालिवूडचा दबंग सलमान खान व लुलिया लग्न करणार असल्याची बातम्या सध्या चर्चेत आहे. यावर सलमानची गर्लफ्रेंड लुलियाने पहिल्यांदाच विधान केलेय."डियर फ्रेंड्स, मला कोणत्याही अफवांवर प्रतिक्रिया देणे महत्त्वाचे वाटले नाही पण, आता मला असे सांगावसे वाटते की मी कधी लग्नाविषयी काही बोलले नाही आणि इतक्यात मला लग्नाचा शालू नेसायचाही नाही" असे लुलियाने इंन्स्टाग्रामवर पोस्ट केले होते.

Web Title: What is the disclosure of Lolia about Salman Khan on the set of 'Voice India Kids'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.