चक्क ! नक्ष आणि गायू पडले प्रेमात
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2016 13:30 IST2016-08-31T08:00:56+5:302016-08-31T13:30:56+5:30
'ये रिश्ता क्या कहलता है' मालिकेतील रोहन मेहरा अर्थात नक्ष आणि कांची सिंग म्हणजेच गायू. सध्या या दोघांवर मालिकेचे ...

चक्क ! नक्ष आणि गायू पडले प्रेमात
' ;ये रिश्ता क्या कहलता है' मालिकेतील रोहन मेहरा अर्थात नक्ष आणि कांची सिंग म्हणजेच गायू. सध्या या दोघांवर मालिकेचे निर्माते खूप चिडते आहेत. याला कारणही तसच आहे. नक्ष आणि गायू हे रिअल लाईफमध्ये दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडलेत. इतकच नाही तर नक्ष आणि गायू जाहिरपणे त्यांच्या प्रेमाची कबूली देत फरितायेत. सध्या ऑनस्क्रिन दोघेही चुलत भाऊ-बहिणीची भूमिका करतांना दिसतायेत. त्यांच्या प्रेमप्रकरणामुळे मालिकेतील भूमिकेवर परिणाम होईल अशी चिंता सध्या निर्मात्यांना सतावतेय. दोघांनाही त्यांच्या प्रेमप्रकरणाविषयी जाहिरपणे बोलण्यास मनाई केलीय तरीही हे दोघे सगळीकडे त्यांच्या प्रेमाचे गोडवे गात फिरतायेत. त्यामुळे नक्ष आणि गायू यांच्या भूमिकेवर जास्त लक्ष न देता फक्त नायराच्या भूमिकेला जास्त महत्त्व दिल जावं असा निर्णय निर्मात्याने घेतल्याचं बोललं जातंय.