वेडिंग दा सिझन है
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2016 02:17 IST2016-03-17T09:17:20+5:302016-03-17T02:17:20+5:30
२०१५-२०१६ हे वर्ष हे ग्लॅमरर्स दुनियेचे वेडिंग दा सिझन है असेच म्हणावे लागेल. कारण भारतीय प्रेक्षकांचा जान असणारा खेळ ...

वेडिंग दा सिझन है
०१५-२०१६ हे वर्ष हे ग्लॅमरर्स दुनियेचे वेडिंग दा सिझन है असेच म्हणावे लागेल. कारण भारतीय प्रेक्षकांचा जान असणारा खेळ म्हणजे क्रिकेट या क्षेत्रात हरभजन सिंग, रोहित शर्मा, आजिंक्य रहाणे,धवल कुलकर्णी या स्टार क्रिकेटपटूंचे दोनांचे चार हात झाले आहेत. तर युवराज सिंगने देखील याच लाईनमध्ये असल्याचे दिसते.तर बॉलीवुड या स्वप्नांच्या नगरीमध्ये उर्मिला मातोंडकर, प्रिटी झिंटा या सुंदर अभिनेत्रींनीदेखील लग्न केले. आता,आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये देखील सनईचे चौघडे वाजवू लागले आहेत. या इंडस्ट्रीमधील सर्वाची लाडकी सून मृणाल दुसानीस, दुनियादारी या चित्रपटातील सुरेखा म्हणजेच रीचा परियाल, तरूणींचा लाडका नील म्हणजेच चिन्मय उदगीरकर, चॉकलेट बॉय सिध्दार्थ मेनन व राडवाडे अॅन्ड सन्समधून या चित्रपटातून पदार्पण करणारा आलोक राजवाडे या सर्व कलाकारांनी एकापाठोपाठ विवाहबंधनात अडकले आहेत. म्हणूनच लोकमत सीएनएक्सने या वेडिंग का सिझनचा घेतलेला आढावा.
![]()
चिन्मय उदगीरकर- गिरीजा जोशी: स्वप्नांच्या पलीकडे, नांदा सौख्य भरे या मालिकेतून घराघरात पोहोचणारा नील म्हणजेच चिन्मय उदगीरकर हा २७ डिसेंबर २०१५ रोजी अभिनेत्री गिरीजा जोशी हिच्यासोबत विवाहबंधनात अडकला. या दोघांची ही ओळख वाजलाच पाहिजे... या चित्रपटाच्या सेटवर झाली. मग या चित्रपटाच्या शुटिंगनंतर जास्त वेळ न घेता या दोघांनी विवाहाच्या बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. लग्न मग प्रेम असे हे नाते असल्याचे चिन्मयने सांगितले.
![]()
सिध्दार्थ मेनन-पौर्णिमा नायर: पोस्टर बॉय, राजवाडे अॅण्ड सन्स या चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा उमठविणारा मराठी इंडस्ट्रीचा चॉकलेट बॉय अभिनेता सिध्दार्थ मेनन हा ३ फ्रेबुवारी रोजी पौर्णिमा नायरसोबत लग्नगाठीत अडकला. त्यांचा विवाह दाक्षिणात्या पद्धतीने पार पडला.यावेळी सिध्दार्थने सफेद रंगाची लुंगी व अंगावर उपरण परिधान केले होते.तर पौर्णिमा दाक्षिणात्या साडीत व दागिन्यांत खूप छान दिसत होती.
![]()
मृणाल दुसानीस- नीरज मोरे: माझिया प्रियाला प्रित मिळेना, तू तिथे मी, असं सासर सुरेखबाई या मालिकेतून सर्वाची लाडकी अभिनेत्री,सून बनलेली मृणाल दुसानीस ही २५ फ्रेबुवारीला नीरज मोरे यांच्यासोबत विवाहबंधनात अडकली. नीरज व मृणालची आोळख लॉस एंजिलिस येथे महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमानिमित्त झाली होती. नीरज हा सॉफ्टवेअर इंजिनिअर असून अमेरिकेतच स्थायिक आहे. मृणाला देखील तिची मालिका संपल्यानंतर दोन वर्षे अमेरिकेला जाणार आहे.
![]()
आलोक राजवाडे-पर्ण पेठे: आलोक राजवाडे आणि पर्ण पेठे ही सुंदर जोडी आपल्याला मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित रमा-माधवन या चित्रपटात पाहायला मिळाली होती. हीच रील लाईफ जोडी २९ फ्रेबुवारीला रिअल लाईफ जोडीदेखील बनली. आलोक व पर्ण यांनी गेली कित्येक वर्षे एकत्रित नाटक देखील केली आहेत. त्यांच्या या सुंदर मैत्रिचे रूपांतर प्रेमात व नंतर लग्नात झाले. विशेष म्हणजे या दोघांचा ही वाढदिवस फ्रेबुवारी महिन्यातच असल्यामुळे योगायोगाने लीप वर्षेच्या निमित्तीने देखील हे दोघे विशेष तारखेलाच विवाहबंधनात अडकले.
![]()
रीचा परियाली-रौनक शर्मा: दुनियादारी या चित्रपटातून सुरेखा म्हणजेचा रीचा परियाली हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकली होती.अजून ही प्रेक्षकांच्या ओठी ही सुरेखा... हे गाणे ऐकण्यास मिळते. ही रीचा देखील मृणाल पाठोपाठ रौनक शर्मा याच्यासोबत विवाह बंधनात अडकली. शेवटी, ही सुरेखा रौनकला पटलेली आहे असे म्हणण्यास हरकत नाही.
मराठी इंडस्ट्रीमध्ये या सर्व प्रेक्षकांच्या लाडक्या कलाकार विवाह बंधनात अडकल्यामुळे काही तरूण, तरूणी नाराज झाले असतील हे नक्कीच. पण असो मराठी इंडस्ट्रीचे हे वेडिंग दा सिझन असे चालू राहू दे. तसेच या सर्व लाडक्या कलाकारांना लोकमत सीएनएक्सच्यावतीने देखील लग्नाच्या व नवीन वाटचालीच्या शुभेच्छा.