Wedding Bells!भारती सिंहच्या लग्नासाठी मिळाला तीन तारखांचा मुहुर्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2017 12:00 IST2017-07-20T06:30:08+5:302017-07-20T12:00:08+5:30

गेल्या काही दिवसांपासून भारती सिंह जिथे दिसायची तिथे तिला तिच्या लग्नाची तारिख विचारली जायची.त्यावेळी तारिख पे तारिख सांगणारी भारतीने ...

Wedding Bells! Bharati Singh's wedding receives three dates | Wedding Bells!भारती सिंहच्या लग्नासाठी मिळाला तीन तारखांचा मुहुर्त

Wedding Bells!भारती सिंहच्या लग्नासाठी मिळाला तीन तारखांचा मुहुर्त

ल्या काही दिवसांपासून भारती सिंह जिथे दिसायची तिथे तिला तिच्या लग्नाची तारिख विचारली जायची.त्यावेळी तारिख पे तारिख सांगणारी भारतीने आता मौन सोडले आहे.विशेष म्हणजे भारती सिंहने लग्नासाठी एक नाही दोन तर चक्क तीन तारखा निवडल्या आहेत. ब-याच दिवसांपासून भारती हर्ष लिम्बाचिया डेट करत होते. दोघांचा साखरपुडाही झाला असून याच वर्षी लग्न करणार असल्याचे भारतीने सागितले होते. मात्र लग्नाची तारिख काही केल्या ठरत नव्हती. भारतीचे कामाचे बिझी शेड्युअमुळे ती दरवेळी तिच्या लग्नाच्या तारखा पुढे ठकलायची. मात्र आता ज्या तारखा तिने नविडल्या आहेत त्यावेळी तिने कोणतेच काम हाती घेतलेले नाहीय.त्यानुसार भारतीला तिच्या लग्नासाठी तीन मुहुर्त मिळाले आहेत.30 नवम्बर, 3 आणि 6  डिसेंम्बर. भारती समोर या तीन मुहुर्ताचा पर्याय तिच्या कुटुंबियांनी तिच्या समोर ठेवला आहे.आता भारती कोणत्या तारखेचा मुहुर्त पसंत करते याकडे लक्ष असताना तिच्या लग्नसाठी लोकेशनचा विचार सुरू आहे. तीन तारखांप्रमाणे लग्नासाठी तीन लोकेशनचा विचार करण्यात आला आहे. त्यानुसार भारतीने मुंबई, पंजाब किंवा गोवा या तीन लोकेशनपैकी एका लोकेशनची निवड करणार असल्याचे सांगितले आहे. भारतीने सांगितले की, 2017 माझ्यासाठी खूप खास आहे. लग्नाची तारिख आणि लग्न होणारे ठिकाण यांवर मला एक नाही तर तीन -तीन पर्याय देण्यात आले आहेत.हर्ष आणि माझ्या आवडीनुसार तसेच  नातेवाईक आणि मित्रमैत्रीणींनाही त्या तारखेला  हजेरी लावणे शक्य व्हावे अशा तारखेवर विचार करत आहोत.भारतीच्या लग्नात हळद, मेहंदी, संगीत यांसारखे समारोह होणार आहेत  त्यामुळे तिच्या लग्नाची  तयारी आताच सुरु झाली आहे. त्यामुळे एक नाही तर तीन मुहुर्तापैकी भारती कोणत्या तारखेला हर्ष लिंबाचियासह लग्नाच्या बेडीत अडकणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.

Web Title: Wedding Bells! Bharati Singh's wedding receives three dates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.