n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;">निकितीन धीर आणि क्रतिका सेनगर यांच्या लग्नाला 3 सप्टेंबरला दोन वर्षं पूर्ण होणार आहेत. निकितीन आणि क्रतिका दोघेही छोट्या पडद्यावर काम करत असल्याने त्यांना मालिकेच्या चित्रीकरणात व्यग्र असल्याने त्या दोघांना एकमेकांना वेळ देता येत नाही. पण या दोघांनीही आपल्या कामातून वेळ काढून लग्नाचा वाढदिवस चांगला साजरा करण्याचे ठरवले आहे. ते दोघे नुकतेच युरोपला फिरायला गेले आहेत. तिथेच ते त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करणार आहेत. युरोपहून आल्यानंतर निकितीन नागार्जुन - एक योद्धा या मालिकेच्या चित्रीकरणाला पुन्हा सुरुवात करणार आहे.