वेब सिरीज का है जमाना !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2016 12:25 IST2016-07-02T06:55:00+5:302016-07-02T12:25:00+5:30

सुवर्णा जैन                                   ...

The web is the time of the series! | वेब सिरीज का है जमाना !

वेब सिरीज का है जमाना !

वर्णा जैन
                                                       
साँस बहू या ड्राम्यानं बराच काळ छोट्या पडदा गाजवला... मात्र आता काळ बदललाय आणि टीव्हीशिवाय इतर माध्यमंही अधिक प्रभावी होऊ लागलीत.. टीव्हीपेक्षा इंटरनेट अधिक आकर्षित करु लागलंय.. खास करुन तरुणाईकडून इंटरनेटचा वापर अधिक होऊ लागलाय.. त्यामुळं इंटरनेटवर वेब सिरीज नावाचा प्रकार तरुणाईला आकर्षित करु लागलाय.. छोट्या पडद्यावरील मालिकांप्रमाणे अधिक रंजक कथा, नवे चेहरे, काळजाला भिडणारे विषय, मनोरंजनाचा मसाला यामुळं या वेब सिरीज तरुणाईमध्ये सुपरडुपर हिट ठरतायत.. नव्या मालिकांप्रमाणे छोट्या पडद्यावर गाजलेल्या काही मालिकाही वेब सिरीजच्या माध्यमातून नेटिझन्सना आकर्षित करतायत.. पाहूया तरुणाईला आकर्षित करणा-या काही वेब सिरीज ....
 


साराभाई VS साराभाई
 
दहा वर्षांपूर्वी छोट्या पडद्यावर रसिकांना खळखळून हसवणारे आणि तुफान मनोरंजन करणारी मालिका म्हणजे साराभाई VS साराभाई... या मालिकेतील पात्रांची नावं ऐकूनच रसिकांच्या चेह-यावर हसू खुलायचं.. साराभाई कुटुंबाच्या दोन गटातील तू-तू-मैं-मैं रसिकांना चांगलीच भावली होती. आता पुन्हा एकदा इंद्रधवन, माया, रोशेष विरुद्ध साहिल-मोनिषा अशी जुगलबंदी रंगणार आहे.. छोट्या पडद्यावरील ही मालिका आता वेब सिरीजच्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला येतेय... खुद्द निर्माते जेडी मजीठिया यांनी याला दुजोरा दिलाय.. इंटरनेटवरील रसिकांकडून वाढती मागणी पाहून साराभाई VS साराभाई वेब सिरीजच्या माध्यमातून आणण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय.
 



शक्तीमान
 
भारतीय छोट्या पडद्यावरील पहिलावहिला सुपरहिरो... 1990 च्या दशकात छोट्या पडद्यावर पंडित गंगाधर विद्याधर मायाधर ओमकारनाथ शास्त्री या फोटो पत्रकाराची एंट्री झाली.. तुमच्या आमच्यासारखा एक सामान्य माणूस.. मात्र ज्यानं मनःशांती आणि ध्यानधारणा करुन सुपरपॉवर मिळवली आणि तो बनला शक्तीमान... शत्रूंचा विनाश करणारा हा शक्तीमान आता छोट्या पडद्यासोबतच इंटरनेटवर वेब सिरीजच्या माध्यमातूनही सुपरहिट ठरतोय.. मुकेश खन्ना यांनी साकारलेला शक्तीमान आणि त्याच्या पराक्रमाच्या सुरस कथा वेब सिरीज मार्फत नेटिझन्सचं मनोरंजन करतायत.


 
'सेक्स चॅट विद पप्पू एंड पप्पा'

लेडीज रुम या वेब सिरीजला मिळालेल्या यशानंतर वाय-फिल्म्स 'सेक्स चॅट विद पप्पू एंड पप्पा'  ही वेब सिरीज नेटिझन्सच्या भेटीला घेऊन आलं.. सेक्सबद्दल पप्पू या किशोरवयीन मुलाच्या मनात असलेल्या अनेक प्रश्नांना त्याचे वडील कशारितीने उत्तर देतात हे या वेब सिरीजमध्ये दाखवण्यात आलं.. सचिन पिळगांवकर, आनंद तिवारी, कबीर साजिद, संजीदा शेख, अलका अमीन या कलाकारांच्या यांत प्रमुख भूमिका आहेत.. सेक्सच्या विषयावर अत्यंत मजेशीररित्या करण्यात आलेलं भाष्य नेटिझन्सना भावतंय..
 



गर्ल इन द सिटी
 
गर्ल इन सिटी ही एक तरुणीची कथा... ही तरुणी आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मायानगरी मुंबईत दाखल होते.. फॅशनच्या जगतात करियर करण्याचं तिचं स्वप्न असतं. उडान या छोट्या पडद्यावरील मालिकेतील अभिनेता रजत बारमेचा यानं या वेब सिरीजमध्ये कार्तिक ही भूमिका साकारली होती.. या तरुणीचं स्वप्न साकार होतं का, कार्तिक तिला मदत करतो का याचं चित्रण म्हणजे गर्ल इन सिटी ही वेब सिरीज.


 
A.I.S.H.A.- माय वर्च्युअल गर्लफ्रेंड
 
A.I.S.H.A.- माय वर्च्युअल गर्लफ्रेंड ही आणखी एक वेब सिरीज तरुणाईमध्ये हिट आहे.. रणविजय सिंगचा छोटा भाऊ हरमन सिंग याची यांत प्रमुख भूमिका.. 26 वर्षीय ऍप विकसित करणारा तरुण एक असं ऍप बनवतो ज्यामुळं धुमाकूळ माजते.
 



परमनन्ट रुममेट्स
 
एक कपल तीन वर्षांपासून एकत्र राहत असतं, वावरत असतं.. अखेर इतक्या वर्षाच्या रिलेशनशिपनंतर हे कपल लग्न बंधनात अडकण्याचा निर्णय घेतं.. त्यानंतर या कपलच्या जीवनात काय होतं याचं चित्रण परमनन्ट रुममेट्स या वेब सिरीजमध्ये पाहायला मिळतं..
 


आय डोन्ट वॉच टीव्ही
 
नेटिझन्समध्ये सुपरहिट ठरलेली वेब सिरीज म्हणजे 'आय डोन्ट वॉच टीव्ही'. चमचमत्या आणि सा-यांनाच आकर्षित करणा-या भारतीय टेलिव्हिजन सृष्टीमागे दडलंय काय हे या वेब सिरीजमध्ये पाहायला मिळतं.. काम मिळवण्यासाठीचा स्ट्रगल, गुप्त पद्धतीने होणा-या काही डिल्स ज्या कधीही जगासमोर येत नाही याचं वास्तव मांडणारी वेब सिरीज तरुणाईला आकर्षित करते.
 


लव बाईट्स
 
लव बाईट्स या वेब सिरीजची कथा एका कपलच्या लिव इन रिलेशनशिपच्या अवतीभवती फिरते.. दोघंही आपलं नातं जगापासून लपवून ठेवतात.. कारण बॉयफ्रेंडची आई आपला स्वीकार करेल का नाही याची भीती या तरुणीला असते. तरुणांच्या चर्चेतला विषय असणारा ही वेब सिरीज नेटिझन्सना अधिकाधिक भावते..
 



बेक्ड
 
दिल्ली विद्यापीठाचे तीन विद्यार्थी काम शोधत असतात... त्याचवेळी फूड डिलिव्हरी सुरु करण्याचा निर्णय ते घेतात आणि ती सुरुही करतात... मात्र दरवेळी काही ना काही गडबड आणि गोंधळ कसा उडतो याचं चित्रण 'बेक्ड' या वेब सिरीजमध्ये पाहायला मिळतं...
 


ऑल अबाऊट सेक्शन 377
 
समलिंगी व्यक्तींच्या समस्यांवर भाष्य करणारी ही वेब सिरीज... एक तरुण जो दोन गे सोबत एकत्र राहत असतो.. समलिंगी व्यक्तींबाबत समाजात असलेले समज-गैरसमज यावर ही वेब सिरीज भाष्य करते.
 


अलिशा
 
एक फॅशन उद्योजिका चार वर्ष लॉस एंजिलिसमध्ये राहिल्यानंतर मुंबईत परतते.. मात्र मुंबईत आल्यावर तिचा खरा संघर्ष सुरु होतो.. काम मिळवण्यासाठी तिला कशारितीने स्ट्रगल करावा लागतो याचं चित्रण 'अलिशा' या वेब सिरीजमध्ये दाखवण्यात आलं..    
 


एआयबी
 
एआयबी नॉक आऊट या सिरीजमुळं गेल्या काही महिन्यांत मोठा वाद निर्माण झाला... कुणावरही काहीही अश्लील शेरेबाजी, शिव्या यामुळं ही वेब सिरीज अधिक चर्चेत राहिली.. किंबहुना त्यामुळंच नेटिझन्समध्ये या एआयबी वेब सिरीजची क्रेझ पाहायला मिळतेय..
 


 नेस कॅफे लॅब
 
उद्योन्मुख आणि नव्या डान्सरना डान्स शिकण्यासाठी एक व्यासपीठ मिळावं या उद्देशानं सुरु करण्यात आलेली वेब सिरीज म्हणजे 'नेस कॅफे लॅब'.प्रसिद्ध कोरियोग्राफर शक्ती मोहन या वेब सिरीजच्या माध्यमातून डान्स टीप्स देते. वेब सिरीजच्या माध्यमातून डान्स टीप्स मिळत असल्यानं ही वेब सिरीज नेटिझन्समध्ये सुपरहिट ठरते...  
 
   
 

Web Title: The web is the time of the series!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.