एकताला आली हम पाचची आठवण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2016 13:15 IST2016-06-29T07:45:09+5:302016-06-29T13:15:09+5:30
एकता कपूरने हम पाच या मालिकेद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. तिची ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. आज ...

एकताला आली हम पाचची आठवण
ए ता कपूरने हम पाच या मालिकेद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. तिची ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. आज इतक्या वर्षांनी एकताला या मालिकेची आठवण आली आहे. एकताचा भाऊ तुषार कपूर याला नुकताच मुलगा झाला. ही गोड बातमी सोशल नेटवर्किंवरून लोकांना सांगताना एकताने आता आम्ही पाच झालो आहोत, हम पाच असे म्हटले आहे. तिने आपल्या भावाचे अभिनंदन तर केले आहे. त्याचसोबत आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात आलेल्या या नव्या पाहुण्यामुळे आम्ही सगळे आनंदित झालो आहोत असेही म्हटले आहे.