आम्ही केवळ मित्रच
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2016 16:20 IST2016-09-21T10:50:03+5:302016-09-21T16:20:03+5:30
उतरण फेम रश्मी देसाई आणि नंदिश संधू यांनी काही दिवसांपूर्वीच घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या दोघांच्या घटस्फोटाची चांगलीच चर्चा ...
.jpg)
आम्ही केवळ मित्रच
उ रण फेम रश्मी देसाई आणि नंदिश संधू यांनी काही दिवसांपूर्वीच घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या दोघांच्या घटस्फोटाची चांगलीच चर्चा मीडियात झाली होती. रश्मी तिच्या आयुष्यात झालेल्या गोष्टी विसरून पुन्हा एकदा नव्या आयुष्याला सुरुवात करत असल्याचे म्हटले जात आहे. अधुरी कहानी हमारी या मालिकेत रश्मी आणि लक्ष लालवानी एकत्र काम करत होते. या मालिकेच्या सेटवर त्या दोघांची ओळख झाली आणि ते एकमेकांचे खूप चांगले मित्रमैत्रीण बनले. चित्रीकरणाच्या दरम्यान लक्ष अनेकवेळा रश्मीच्या मेकअप रूपममध्ये असायचा. तसेच चित्रीकरण संपल्यावरही ते दोघे एकमेकांसोबत वेळ घालवायचे. ते नेहमी त्यांचे एकत्र फोटो सोशल मीडियावरही पोस्ट करत असतात. यावरून दाल में कुछ काला है अशी चर्चा सुरू आहे. पण लक्ष हा माझा केवळ चांगला मित्र आहे आणि मी माझ्या सोशल नेटवर्किंग साईटवर कोणाचेही फोटो पोस्ट करू शकते असे रश्मीचे म्हणणे आहे.