इच्छा तेथे मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2016 10:18 IST2016-09-30T04:48:32+5:302016-09-30T10:18:32+5:30

मास्टरशेफ इंडिया या कार्यक्रमात विकास खन्ना परीक्षकाची भूमिका साकारत आहे. या कार्यक्रमाचे सध्या जोरदार चित्रीकरण सुरू आहे. केवळ भारतातच ...

The way there is the desire | इच्छा तेथे मार्ग

इच्छा तेथे मार्ग

स्टरशेफ इंडिया या कार्यक्रमात विकास खन्ना परीक्षकाची भूमिका साकारत आहे. या कार्यक्रमाचे सध्या जोरदार चित्रीकरण सुरू आहे. केवळ भारतातच नव्हे तर परदेशातदेखील या कार्यक्रमाचे चित्रीकरण केले जाणार आहे. सगळ्या स्पर्धकांसोबतच या कार्यक्रमातील परीक्षकही यासाठी खूप उत्सुक आहेत. हा सिझन आतापर्यंतचा सगळ्यात चांगला सिझन असावा यासाठी ते प्रयत्न करत आहेत. विकास खन्नाने मास्टरशेफ इंडिया या कार्यक्रमाच्या सगळ्या सिझनचे परीक्षण केले आहे. त्यामुळे विकासचा अनुभव इतरांपेक्षा दांडगा आहे आणि त्याच्या अनुभवाचा स्पर्धक आणि परीक्षक सगळ्यांनाच उपयोग होणार आहे. पण विकासच्या डाव्या हाताला नुकतीच एक गाठ आली होती. या गाठीचे ऑपरेशन करावे लागले. त्यामुळे त्याला कित्येक दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे विकास चित्रीकरण कसा करणार हा सगळ्यांना प्रश्न पडला होता. पण त्याची तब्येत सुधारत असल्याने त्याला नुकताच डिस्चार्ज देण्यात आला. तब्येत पूर्णपणे बरी नसली तरी तो कार्यक्रमाचे चित्रीकरण, प्रमोशन करत आहे. ऑपरेशन होऊनही विकास कामाला अधिक प्राधान्य देत आहे. 

Web Title: The way there is the desire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.