पाणीची उत्सुकता
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2016 18:13 IST2016-05-13T12:43:05+5:302016-05-13T18:13:05+5:30
यंदाच्या कान फिल्म फेस्टिव्हलला भारताकडून माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राजवर्धन राठोड गेलेले आहेत. कान फेस्टिव्हलला नुकतीच त्यांची भेट अभिनेता ...

पाणीची उत्सुकता
य दाच्या कान फिल्म फेस्टिव्हलला भारताकडून माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राजवर्धन राठोड गेलेले आहेत. कान फेस्टिव्हलला नुकतीच त्यांची भेट अभिनेता आदिनाथ कोठारेशी झाली. राजवर्धन यांनी आदिनाथशी यांनी खूप साऱ्या गप्पा मारल्या. आदिनाथने त्यांना त्यांच्या पाणी या आगामी चित्रपटाविषयी सांगितले. चित्रपटाचा विषय ऐकून ते खूपच खूश झाले. पाणी या अतिशय महत्त्वाच्या विषयासाठी आदिनाथ खूप चांगले काम करत असल्याचे त्यांनी त्याला सांगितले आणि चित्रपट पूर्ण झाल्यावर मला नक्कीच दाखव असेही सांगायला ते विसरले नाहीत.