अखेर प्रतीक्षा संपली 'रात्रीस खेळ चाले 2'च्या पहिल्या भागाला प्रेक्षकांची दाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2019 18:35 IST2019-01-15T18:24:32+5:302019-01-15T18:35:31+5:30

'झी मराठी'वरील रात्रीस खेळ चाले ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांना पहिल्या भागाची उत्सुकता लागली होती, ती अखेर संपली आहे.

Wait is over ratris khel chale 2 got huge response from viewers | अखेर प्रतीक्षा संपली 'रात्रीस खेळ चाले 2'च्या पहिल्या भागाला प्रेक्षकांची दाद

अखेर प्रतीक्षा संपली 'रात्रीस खेळ चाले 2'च्या पहिल्या भागाला प्रेक्षकांची दाद

ठळक मुद्देमालिकेची सुरुवात अण्णांच्या मृत्यूने होते मालिकाचा पहिलाच भाग प्रेक्षकांची उत्कांठा वाढवणारा होता

झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांना पहिल्या भागाची उत्सुकता लागली होती, ती अखेर संपली आहे. मालिकेची सुरुवात अण्णांच्या मृत्यूने होते आणि त्यानंतर फ्लॅशबॅकमध्ये जात अण्णा व माईचा संसार दाखवण्यात आला आहे. ज्यात आपल्याला अण्णांची दहशत पाहायला मिळतेय. या दहशतीमध्ये अण्णा काय काय करू शकतात याचा प्रत्यय पहिल्या भागात पाहायला मिळालाय. मालिकाचा पहिलाच भाग प्रेक्षकांची उत्कांठा वाढवणारा होता. त्यामुळे पहिल्या सीझन प्रमाणेच हा सीझनदेखील तितकाच यशस्वी होईल यात काही वाद नाही.


माधव अभ्यंकर यांनी अण्णांची भूमिका चोख बजावत आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. तर शकुंतला नरे यांनी माईंची तरुणपणातील भूमिका सक्षमपणे साकारली आहे. कोकणच्या पार्श्वभूमी असलेल्या या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते.

पहिल्या सीझनचे यश पाहता प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती त्यामुळे दुसरा सीझन ही तेवढाच हिट जाईल तेवढाच यात काही शंका नाही.      

Web Title: Wait is over ratris khel chale 2 got huge response from viewers