'ये रिश्ता' फेम अभिनेत्रीने बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ, सोशल मीडियावर शेअर केले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 12:04 PM2023-12-11T12:04:37+5:302023-12-11T12:06:54+5:30

आपल्या लग्नाचे सुंदर फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Vrushika mehta ties the knot with beau saurabh ghedia shares wedding inside photos | 'ये रिश्ता' फेम अभिनेत्रीने बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ, सोशल मीडियावर शेअर केले फोटो

'ये रिश्ता' फेम अभिनेत्रीने बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ, सोशल मीडियावर शेअर केले फोटो

सध्या इंडस्ट्रीमध्ये लग्नाचे वारे वाहतायेत. नुकतीच बॉलिवूड गायिका नीती मोहन आणि कोरिओग्राफर शक्ती मोहनची बहीण मुक्ती मोहन हिने 'अ‍ॅनिमल' फेम अभिनेता कुणाल ठाकूरसोबत लग्नगाठ बांधली. यानतर टीव्ही अभिनेत्री वृषिका मेहता(Vrushika Mehta) ने देखील लग्न केलं आहे. आपल्या लग्नाचे सुंदर फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. वृषिका 'ये रिश्ता क्या कहलाता है' आणि 'दिल दोस्ती डान्स' या टीव्ही मालिकांसाठी ओळखली जाते. 

अभिनेत्री वृषिका मेहताने 10 डिसेंबर रोजी तिच्या लग्नाचे फोटो शेअर केले होते. 9 डिसेंबर रोजी त्यांनी लग्नगाठ बांधली आहे. फोटो शेअर करताना अभिनेत्रीने संस्कृत श्लोक लिहिला, 'साथी त्वयि सांगे कुरुतन चिरायुह. सर्वरिष्टे सफलम् भवत्विती..गेल्यावर्षी 11 डिसेंबर 2022 रोजी वृषिकाने साखरपुडा केला होता. 

वृषिकाने दोनदा लग्न केले आहे. याचा अंदाज त्यांच्या लग्नाच्या फोटोंवरून लावता येतो. अभिनेत्रीने लाल रंगाच्या ड्रेसमध्ये फोटो शेअर केले होते. यानंतर तिने पांढऱ्या रंगाच्या लेहेंग्यातले फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती लग्नाचे विधी करताना दिसत आहे. लग्नापर्यंतच्या खास क्षणांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. 

वृषिका मेहताने तिचा बॉयफ्रेंड सौरभ घेडियासोबत सातफेरे घेतले आहेत. तो व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून त्यांची भेट झाली आणि आता दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. 

वृषिका मेहताबद्दल बोलायचे झाले तर, ती 'ये रिश्ता क्या कहलाता है', 'दिल दोस्ती डान्स', 'ये है आशिकी', 'इश्कबाज' आणि 'ये तेरी गलियां' सारख्या मालिकांमध्ये झळकली आहे.  'ये रिश्ता क्या कहलाता है' मध्ये डॉ. रिद्धिमा सक्सेनाची भूमिका साकारून वृषिका मेहताने खूप लोकप्रियता मिळवली. तिची मोहसीन खानसोबतची जोडीही चांगली होती. वृषिका शेवटची 'कुमकुम भाग्य'मध्ये स्पेशल अपिअरन्समध्ये दिसली होती.

Web Title: Vrushika mehta ties the knot with beau saurabh ghedia shares wedding inside photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.