The Voice India Season2: पहिल्यांदाच या मंचावर घडल्या या गोष्टी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2017 16:57 IST2017-02-03T11:27:27+5:302017-02-03T16:57:27+5:30
लवकरच 'व्हॉईस इंडिया सिझन 2' च्या मंचावर टॉपच्या 12 स्पर्धकांसोबत 12 सेलिब्रेटी गायकांसह धमाकेदार परफॉर्मन्स या मंचावर पहिल्यांदाच रंगणार ...
.jpg)
The Voice India Season2: पहिल्यांदाच या मंचावर घडल्या या गोष्टी?
ल करच 'व्हॉईस इंडिया सिझन 2' च्या मंचावर टॉपच्या 12 स्पर्धकांसोबत 12 सेलिब्रेटी गायकांसह धमाकेदार परफॉर्मन्स या मंचावर पहिल्यांदाच रंगणार आहेत.मोठ्या उत्साहात या राऊंडमध्ये सर्व कोचेसनी त्यांच्या टीममधून प्रत्येकी 3 स्पर्धक निवडले आहेत.आता या स्पर्धकांना स्वतंत्ररित्या जज केले जाणार आहे.स्पर्धकांना या जजेससमोर आपल्या क्षमता मांडून त्यांनाच आपल्या आवजाच्या क्षमता तपासण्याची संधी देण्यासाठी आता हे स्पर्धक या आघाडीच्या गायकांसह आपली कला सादर करताना दिसतील.टीम शानमधील दिल्लीचे फरहान सबीर, नेहा खंक्रियाल आणि पंजाबच्या परखजीत सिंह या स्पर्धकांचा समावेश आहे.त्यांच्यासोबत उस्मान मीर,आकृती कक्कर आणि यॅश किंग हे प्रसिध्द गायक आपली सुरेल साथ देणार आहेत.
तर टीम नीतीमधील नीयम कानुंगो,मोहम्मद डॅनिश आणि नेहा भानुशाली यांच्यासमोर रसिकांना यांचा दमदार परफॉर्मन्स पाहायला मिळणार असून मास्टर सलीम आणि मोहम्मद इरफान टीम बेनीमधील दिव्यांस वर्मा,रसिका बोरकर आणि सोना वकिल यांच्यासोबत आदित्य नारायण, अदिती सिंग शर्मा आणि दिव्या कुमार असतील.टीम सलीममधील शरयू दाते,यशोधन राव कदम आणि पारस मान यांच्यासोबत प्रसिध्द गायिका भूमी त्रिवेदी,जोनिता गांधी आणि रिचा शर्मा या तिघांची मैफल रंगणार आहे.हे सर्व 12 सेलिब्रेटी गायक पहिल्यांदाच व्हॉईस इंडियाच्या मंचावर या स्पर्धकांसह आपला परफॉर्मन्स देत रसिकांना आपल्या सुरेल मैफलीने मंत्रमुग्ध करतील हे मात्र नक्की.या स्पर्धकांसाठी त्यांच्या चाहत्या गायकांसह त्यांना पहिल्यांदाच गाण्याची संधी मिळणार असल्यामुळे या स्पर्धकांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.त्यामुळे प्रत्येक स्पर्धक यासाठी खूप जोशात तयारी करतोय.आपल्या परफॉर्मन्समध्ये कुठेही कमी राहु नये यासाठी सारेच कसून मेहनत करतायेत.या टॉप गायकांसह गाण्याची संधी मिळणे म्हणजे हा शो जिंकल्यासारखे असल्याचे या स्पर्धकांनी म्हटले आहे.