​कुमकुम भाग्य नंतर कुंडली भाग्य प्रेक्षकांच्या भेटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2017 12:13 IST2017-06-24T06:43:06+5:302017-06-24T12:13:06+5:30

कुमकुम भाग्य या मालिकेतील अभी आणि प्रग्या या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या होत्या. ही मालिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली ...

Visitors visit the horoscope fortune fortune after the Kumkum fortune | ​कुमकुम भाग्य नंतर कुंडली भाग्य प्रेक्षकांच्या भेटीस

​कुमकुम भाग्य नंतर कुंडली भाग्य प्रेक्षकांच्या भेटीस

मकुम भाग्य या मालिकेतील अभी आणि प्रग्या या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या होत्या. ही मालिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली आहे. या मालिकेतील अभी आणि प्रग्या या दोघांची प्रेमकथा प्रेक्षकांना प्रचंड भावते. या मालिकेने सुरुवातीपासूनच खूप चांगला टिआरपी मिळवला. या मालिकेने नुकतेच 1000 भाग पूर्ण केले. आजही प्रग्या आणि अभी यांची प्रेमकथा पूर्णपणे उलगडलेली नाहीये. याच मालिकेच्या कथानकाला समांतर एक मालिका बालाजी टेलिफ्लिम्स घेऊन येत आहे. कुंडली भाग्य असे या मालिकेचे नाव असणार आहे.
कुंडली भाग्य या मालिकेत प्रग्याच्या बहिणी प्रीता आणि सृष्टी यांची कथा पाहायला मिळणार आहे. अतिशय श्रीमंत अशा लुथ्रा या पंजाबी कुटुंबियांसोबतचे प्रीता आणि सृष्टीचे नाते प्रेक्षकांना पाहाता येणार आहे. लुथ्रा कुटुंबातील ऱिषभची एक सेलिब्रेटी मॅनेजमेंट कंपनी असून त्याची कंपनी अनेक सेलिब्रेटींच्या कामाचे नियोजन पाहाते. कुमकुम भाग्यमधील अभीच्या म्हणजेच शब्बीर आहुवालियाच्या संगीत कारकिर्दीचे देखील हीच कंपनी नियोजन करणार आहे. रिषभला एक लहान भाऊ असणार असून ही भूमिका धीरज धूपर साकारणार आहे तर मनित जौरा रिषभची भूमिका साकारणार आहे. या भूमिकेविषयी धीरज सांगतो, कुंडली भाग्य या मालिकेचा मी हिस्सा होत असल्याचा मला आनंद होत आहे. मी या मालिकेत करण ही भूमिका साकारत असून तो अतिशय श्रीमंत दाखवला आहे. त्याला पैसे कमवण्याची कधीच चिंता नाहीये. तो एक चांगला क्रिकेटपट्टू आहे. त्याची राहाणी ही एखाद्या रॉकस्टारप्रमाणे आहे. त्याला पाहाताच क्षणी मुली त्याच्यावर फिदा होतात. या मालिकेतील भूमिका माझ्या आतापर्यंतच्या भूमिकांपेक्षा खूपच वेगळी आहे. 
कुंडली भाग्यमध्ये शब्बीर आहुवालियादेखील प्रेक्षकांना दिसणार आहे. 

Web Title: Visitors visit the horoscope fortune fortune after the Kumkum fortune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.