​‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत या भूमिकेत दिसणार नसिरुद्दिन आणि रत्ना पाठक यांचा मुलगा विवान शहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2018 13:07 IST2018-05-17T08:59:27+5:302018-05-26T13:07:47+5:30

‘हॅपी न्यू इयर’ चित्रपटात भूमिका साकारलेला विवान शहा ‘स्टार प्लस’वरील ‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ या आगामी मालिकेतील भूमिकेद्वारे टीव्ही ...

Vishwan Shah, son of Naseeruddin and Ratna Pathak, who appears in the role of 'Maryam Khan - Reporting Live' | ​‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत या भूमिकेत दिसणार नसिरुद्दिन आणि रत्ना पाठक यांचा मुलगा विवान शहा

​‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत या भूमिकेत दिसणार नसिरुद्दिन आणि रत्ना पाठक यांचा मुलगा विवान शहा

ॅपी न्यू इयर’ चित्रपटात भूमिका साकारलेला विवान शहा ‘स्टार प्लस’वरील ‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ या आगामी मालिकेतील भूमिकेद्वारे टीव्ही मालिकांमध्ये पदार्पण करत आहे. अनेक अभिनेते आपल्या भूमिकांमध्ये वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी विविध माध्यमांमध्ये भूमिका साकारताना दिसत असून आता विवान शहा ‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ या आगामी मालिकेत एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेसाठी निर्मात्यांना एका नव्या, ताज्या आणि तरुण चेहऱ्याची गरज होती. नसिरुद्दिन शहा आणि रत्ना पाठक यांचा मुलगा विवान हा या निकषांत अचूक बसत होता. अर्थात विवान याची औपचारिक नियुक्ती करण्यात आलेली नसली, तरी तो लवकरच निर्मात्यांना भेटेल आणि येत्या आठवड्यात चित्रीकरणाला प्रारंभ करील, अशी अपेक्षा आहे.
या मालिकेत नऊ वर्षांची चिमुरडी देशना दुगड मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. भोपालच्या पार्श्वभूमीवर मालिकेची कथा असणार आहे. या मालिकेपूर्वीही देशना 'इस प्यार को क्या नाम दूँ' आणि 'बाल कृष्ण' या मालिकेत झळकली होती. या मुलीचा जगाकडे पाहण्याचा निरागस दृष्टिकोन आपल्याला ताज्या हवेच्या झुळुकीसारखा ताजेतवाने करणारा ठरणार असल्याची मालिकेच्या टीमला खात्री आहे. सध्या अनेक मालिकेत बच्चेकंपनीचा बोलबाला असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकवेळा बच्चेकंपनीला आपण लहान भूमिका करताना पाहिले आहे. मात्र आता तसे नसून बच्चेकंपनी मुख्य भूमिका साकारताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या मालिकांना रसिकांचीही चांगली पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. 'कुल्फी कुमार बाजेवाला' मालिकेतही  आकृती शर्मा ही सात वर्षाची चिमुरडी मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. अल्पावधीतच या मालिकेला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे 'कुल्फी कुमार बाजेवाला'प्रमाणेच 'मरियम खान-रिपोर्टिंग लाइव्ह'ही मालिका रसिकांचे मनं जिंकण्यात यशस्वी ठरेल असा निर्मात्यांना विश्वास आहे.

Also Read : ​बिग बी अमिताभ बच्चनहे आहेत ‘मरियम खान-रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेतीला या बालकलाकाराचे फॅन!

Web Title: Vishwan Shah, son of Naseeruddin and Ratna Pathak, who appears in the role of 'Maryam Khan - Reporting Live'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.