‘चक्रवर्ती अशोक सम्राट’मध्ये मयंक साकारणार ‘विराट’
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2016 16:13 IST2016-07-14T10:43:22+5:302016-07-14T16:13:22+5:30
चक्रवर्ती अशोक सम्राटवर भारतीय इतिहासाच्या पानांमध्ये विराट म्हणून मयंक गांधी प्रवेश करत आहे. कलर्सची ऐतिहासिक नाट्यमय मालिका चक्रवर्ती अशोक सम्राट ...
.jpg)
‘चक्रवर्ती अशोक सम्राट’मध्ये मयंक साकारणार ‘विराट’
च ्रवर्ती अशोक सम्राटवर भारतीय इतिहासाच्या पानांमध्ये विराट म्हणून मयंक गांधी प्रवेश करत आहे. कलर्सची ऐतिहासिक नाट्यमय मालिका चक्रवर्ती अशोक सम्राट एका पिढीच्या उडीनंतर, तसेच एकदम नवे कलाकार आणि पात्रे असूनही प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात आणि त्यांचे लक्ष वेधून ठेवण्यात यशस्वी ठरली आहे. या शोमध्ये सम्राट अशोकाच्या एका तरूण राजकुमारातून एक खुनशी नेता बनण्याच्या प्रवासाचा शोध घेतलेला आहे. भारतीय इतिहासाची पाने उलगडताना, अशोकाच्या जीवनात अजून एक मोठी कलाटणी येणार आहे. कारण विराटची भूमिका साकारणारा लोकप्रिय अभिनेता मयंक गांधीचा प्रवेश होणार आहे.
एक रहस्यमय पात्र ज्याची पाश्र्वभूमि माहित नाही असा विराट ही काही मजबूत राजकीय मते असणारी एक अधिकृत व्यक्ती आहे. त्याची अशोका (मोहित रैना) सोबतची पहिली भेट ही मैत्री शिवाय दुसरे काही सिद्ध करेल पण अखेरीस ते दोघे चांगले मित्र बनणार आहेत आणि एकमेकांच्या संगतीचा आनंद लुटणार आहेत. कथा पुढे सरकत असताना, विराटची मैत्री ही अशोकासाठी अवगुंठनातील वरदान सिद्ध होणार आहे कारण तो अशोक आणि कौरवकीच्या (सौम्या सेठ) प्रेमकथेमध्ये एक प्रमुख पात्र बनणार आहे.
त्याच्या भूमिकेबद्दल बोलताना, मयंक म्हणाला, “चक्रवर्ती अशोक सम्राट ही आजच्या टेलिव्हिजनवरील सर्वात जास्त आवडत्या ऐतिहासिक नाट्यमय मालिकांमधील एक आहे. अशोकाच्या कथेविषयी माझ्या मनात नेहमीच कुतुहल होते आणि मी प्रत्येक उपलब्ध संधीचा वापर करून त्याच्या विषयी वाचण्याचा प्रयत्न केला आहे. आता जेव्हा मला या शोमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे तर माझी उत्सुकता अतिशय वाढली आहे. हे पात्र अतिशय हुशार आहे आणि त्यांच्या क्षमतेशी जुळवून घेणे हे माझ्यासाठी एक आव्हानच आहे. विराटचे पात्र हे बहुपैलूत्व असणारे आहे आणि अशोकाच्या जीवनातील अनेक लक्षणीय बदल घडवून आणणारी शक्ती तो बनणार आहे. कलर्ससोबत आणि या प्रचंड मोठ्या प्रमाणातील प्रकल्पामध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे मी अतिशय आनंदित झालो आहे आणि टीमसोबत असाच आनंद पुढेही लुटायला मिळेल याची वाट पहात आहे.”