हाफ मॅरेजमध्ये झळकणार विंध्या तिवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2018 17:07 IST2018-02-23T11:37:26+5:302018-02-23T17:07:26+5:30

मनोरंजन व नाट्यमयता वाढवण्याच्या दृष्टीने आणि प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी टीव्हीवरील मालिकांमध्ये अनेकदा टाईम लॅप्स म्हणजेच कथानक काही वर्षांनी, ...

Vindhya Tiwary to appear in Half Marriage | हाफ मॅरेजमध्ये झळकणार विंध्या तिवारी

हाफ मॅरेजमध्ये झळकणार विंध्या तिवारी

ोरंजन व नाट्यमयता वाढवण्याच्या दृष्टीने आणि प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी टीव्हीवरील मालिकांमध्ये अनेकदा टाईम लॅप्स म्हणजेच कथानक काही वर्षांनी, काही पिढ्यांनी पुढे गेल्याचे दाखवले जाते. आता छोट्या पडद्यावर  हाफ मॅरेज या फिक्शन मालिकेत २ वर्षांचा लिप दाखवला जाणार आहे.अर्जुन (तरुण महिलानी) आणि चंदिनी (प्रियंका पुरोहित) यांच्या आयुष्यात एक नवे वळण आल्याने, माया, हे नवीन पात्र आपल्यासमोर आणण्यास शो सज्ज झाला आहे.मागील काही वर्षांत आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांना भुरळ पाडणारी दूरदर्शन अभिनेत्री विंध्या तिवारी आता मायाच्या भूमिकेत दिसणार आहे.हाफ मॅरेजमध्ये माया, राज शेखावतची (तरुण महिलानीच) सेक्रेटरी असेल. राजेशची मैत्रीण व विश्वासार्ह असल्याचे माया जगाला दाखवण्याचा प्रयत्न करीत असताना राज तिच्या वागण्याची दाखल घेत नाही आणि तिला सेक्रेटरी म्हणून वागवत राहतो. दीड वर्षे राजसाठी काम करता करता माया त्याच्यावर प्रेम करू लागते आणि त्याला आपल्या जीवनाचा एक भाग बनवू इच्छिते.सूत्रांनुसार माया, चांदनी व अर्जुनच्या प्रेमकथेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. हाफ मॅरेजमध्ये तिच्या एंट्रीबद्दल विचारले असता, विंध्या म्हणाली, मी कविता बरजात्याबरोबर यापूर्वी काम केले आहे आणि मला ह्या शोसाठी विचारण्यात आले तेव्हा मी उडालेच.मला ही भूमिका देण्यास ती खूप उत्सुक होती, ह्या कारणामुळेच ही भूमिका करण्यास मी एका दिवसात तयार झाले. मायाचे पात्रदेखील माझ्या आवडीचे असे काहीतरी होते; शोमध्ये तिची समांतर मुख्य भूमिका असेल. हाफ मॅरेजमध्ये माझी एंट्री, पोस्ट लीप डेव्हलपमेंट असल्यामुळे प्रेक्षकांसमोर बऱ्याच घटना उलगडत जातील. चॅनलसोबत हा माझा दुसरा करार आहे आणि मी माझ्या शोच्या पुढच्या प्रवासासाठी खूप उत्सुक आहे.

Web Title: Vindhya Tiwary to appear in Half Marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.