पोरस मालिकेतील विकास वर्माचा लूक आहे या हॉलिवूड अभिनेत्याप्रमाणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 08:30 IST2018-10-29T14:36:07+5:302018-10-30T08:30:00+5:30

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील पोरस या या भव्य दिव्य मालिकेत सध्या विकास वर्मा हा देखणा अभिनेता सेल्युकस निकेटर या शक्तिशाली योद्ध्याच्या भूमिकेत दिसत आहे. सेल्युकस हा अॅलेक्झांडरचा सर्वाधिक विश्वासू सेनापती होता.

Vikas Verma's look from Porus is inspired from brad pitt's look from troy movie | पोरस मालिकेतील विकास वर्माचा लूक आहे या हॉलिवूड अभिनेत्याप्रमाणे

पोरस मालिकेतील विकास वर्माचा लूक आहे या हॉलिवूड अभिनेत्याप्रमाणे

पोरस या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा या प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. या मालिकेत आता प्रेक्षकांना कार्तिकेय मालवीयला पाहायला मिळणार आहे. या मालिकेत तो चंद्रगुप्त मौर्यच्या भूमिकेत दिसणार आहे. पोरस या मालिकेत एका नवीन अध्यायाचा सुरुवात होणार असून प्रेक्षकांना राजा चंद्रगुप्त मौर्य यांचा उदय पाहायला मिळणार आहे. चंद्रगुप्त मौर्य कोणत्याही संकटातून नेहमीच मार्ग काढतात, तसेच उत्कृष्ट नेतृत्व करतात अशी त्यांची ख्याती होती.  

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील पोरस या या भव्य दिव्य मालिकेत सध्या विकास वर्मा हा देखणा अभिनेता सेल्युकस निकेटर या शक्तिशाली योद्ध्याच्या भूमिकेत दिसत आहे. सेल्युकस हा अॅलेक्झांडरचा सर्वाधिक विश्वासू सेनापती होता. विकासचा या मालिकेतील लूक हा खास असणार आहे. या मालिकेतील त्याच्या या मालिकेतील लुकची प्रेरणा आहे प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेता ब्रॅड पिट! त्याच्या ‘ट्रॉय’ या गाजलेल्या चित्रपटातून विकासने त्याच्या लूकची प्रेरणा घेतली आहे आणि तो एखाद्या ग्रीक देवतेसारख्या क्लासी पण फॅन्सी लुकमध्ये प्रेक्षकांना दिसत आहे. 

विकास वर्माला पोरस या मालिकेतील त्याच्या लूकबाबत विचारले असता तो सांगतो, “माझ्या लुकबाबत मी खूप उत्सुक आहे. हे एक फॅन्सी पात्र आहे आणि त्याचा पोशाख, त्याचा लूक हा खूपच छान आहे. या मालिकेतील माझा लूक मला खूपच आवडत आहे. या मालिकेतील माझ्या लुकची प्रेरणा ‘ट्रॉय’ चित्रपटात ब्रॅड पिटने साकारलेल्या अकीलीस या प्रसिद्ध पात्राच्या लुकमधून घेतलेली आहे. अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्यापासूनच मला एखादी ग्रीक व्यक्तिरेखा साकारण्याची इच्छा होती आणि आता ती मला मिळाली आहे. सेल्युकस निकेटर एक निर्दयी योद्धा होता. जो महत्त्वाकांक्षी, चाणाक्ष, सामर्थ्यशाली आणि क्रूर होता. त्यामुळे एक वेगळी व्यक्तिरेखा मला साकारायला मिळत आहे याचा मला आनंद होत आहे.”

पोरस ही मालिका प्रेक्षकांना सोमवार ते शुक्रवार रात्री आठ वाजता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर पाहायला मिळते. 
 

Web Title: Vikas Verma's look from Porus is inspired from brad pitt's look from troy movie