"विद्या बालनसोबत स्क्रीन शेअर करणं...", कमळीने व्यक्त केला आनंद; विजया बाबरची पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 10:14 IST2025-07-08T10:14:14+5:302025-07-08T10:14:39+5:30
विजया बाबरने विद्या बालनसोबतचे सेटवरचे काही फोटो शेअर करत लिहिले...

"विद्या बालनसोबत स्क्रीन शेअर करणं...", कमळीने व्यक्त केला आनंद; विजया बाबरची पोस्ट
झी मराठीवर 'कमळी' ही मालिका सुरु झाली आहे. अभिनेत्री विजया बाबर (Vijaya Babar) या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. मालिकेचा प्रोमो आला तेव्हा त्यात चक्क अभिनेत्री विद्या बालनही झळकली. विद्या हातात छडी घेऊन कमळीला प्रश्न विचारताना दिसते. ती तिची शिक्षिका असते. दोघींचा मजेशीर संवाद प्रेक्षकांनीही एन्जॉय केला. विद्यासोबत स्क्रीन शेअर करुन कसं वाटलं याचा अनुभव विजया शेअर केला आहे. तिने सोशल मीडियावर यानिमित्त पोस्ट केली आहे.
विजया बाबरने विद्या बालनसोबतचे सेटवरचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये विद्या तिच्यासोबत छान मस्ती करतानाही दिसत आहे. या फोटोंना कॅप्शन देत विजयाने लिहिले, "विद्या बालनसोबत मला स्क्रीन शेअर करायची संधी मिळाली यावर माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. तिचं व्यक्तिमत्व खरोखर प्रभावी आणि आकर्षक आहे. या सुंदर क्षणांसाठी झी मराठीचे आभार. बेस्ट टीम."
विजयाच्या या फोटोंवर काही कलाकरांनीही कमेंट करत वाहवाही केली आहे. विद्या बालन अनेकदा सोशल मीडियावर मराठीच्या कॉमेडी डायलॉग्सवर रील शेअर करत असते. हास्यजत्रेच्या अनेक डायलॉग्सवर तिने रील केलं आहे जे व्हायरल होतं.
विजया बाबर याआधी 'छोट्या बयोची मोठी स्वप्नं' मालिकेत दिसली होती. आता कमळीमधूनही ती प्रेक्षकांचं मन जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे. मालिका झी मराठीवर रात्री ९ वाजता प्रसारित करण्यात येत आहे.