विजय तुरुंगात असल्याने त्याच्या मदतीला धावली बुलबुल,असा होता लूक!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2018 06:52 AM2018-03-28T06:52:00+5:302018-03-28T12:22:00+5:30

छोट्या पडद्यावरील ‘साम दाम दंड भेद’ या मालिकेच्या कथानकात अनेक गौप्यस्फोट होत असून कथानकाला नवे वळण मिळत असल्यामुळे आगामी ...

Vijay was in jail because he was bullied to help, Luke! | विजय तुरुंगात असल्याने त्याच्या मदतीला धावली बुलबुल,असा होता लूक!

विजय तुरुंगात असल्याने त्याच्या मदतीला धावली बुलबुल,असा होता लूक!

googlenewsNext
ट्या पडद्यावरील ‘साम दाम दंड भेद’ या मालिकेच्या कथानकात अनेक गौप्यस्फोट होत असून कथानकाला नवे वळण मिळत असल्यामुळे आगामी मालिकेचे भाग अधिक रंजक असणार आहेत. आपला पती विजय नामधारी याच्या मदतीसाठी बुलबुलने (ऐश्वर्या खरे) आतापर्यंत अनेकदा वेगवेगळी रूपं घेतली आहेत.यापूर्वी तिने एका 60 वर्षांच्या म्हाता-या बाईचाही वेषात ती दिसली होती.आता तुरुंगात पती विजयच्या मदतीसाठी ती चक्क सरदारजीचा वेश धारण करणार आहे.मालिकेच्या सध्याच्या कथानकानुसार,आपला भाऊ प्रभात याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवला गेल्याने विजय (भानू उदय) हा तुरुंगात गेला आहे.पण विजय हा निर्दोष आहे, अशी पक्की माहिती मिळाल्यावर त्याच्या सुटकेसाठी आणि त्याच्या निर्दोषत्त्वाचा पुरावा मिळविण्यासाठी बुलबुल चक्क सरदारजीचा लकू धारण करते.विजय नामधारीची भूमिका रंगविणारा भानू उदय सांगतो, “मालिकेचं कथानक आता वेगात पुढे चाललं असून त्याला मध्येच अनपेक्षित वळणं आणि कलाटण्या मिळत आहेत. आता जेलमधील प्रसंग आणि तिथे एक सरदारजीच्या रूपात बुलबुलचं येणं यामुळे प्रेक्षकांना काही रंजक प्रसंग पाहायला मिळतील.प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास आम्ही कटिबध्द आहोत.”बुलबुलची भूमिका साकारणारी ऐश्वर्या खरे म्हणते,“भूमिकेत विविध प्रयोग करण्यास मी नेहमीच तयार असते.यावेळी मला सरदारजीची वेशभूषा करण्यात आली असून त्या वेशभूषेत भूमिका साकारणं मजेशीर आणि आव्हानात्मकही आहे.मला जी पगडी घातली होती, ती जड होती आणि माझ्या लांब केसांमुळे ती दिवसभर डोक्यावर ठेवून वावरणं त्रासदायक वाटत होतं. तरीही मी ही भूमिका यशस्वीपणे पार पाडली. प्रेक्षकांनाही ती पसंत पडेल, अशी आशा आहे.”

Also Read:‘साम दाम दंड भेद’ या मालिकेतील या अभिनेत्रींची ऑफस्क्रीन 'याराना'!

बॉलिवूड असो किंवा टीव्ही इडस्ट्री ग्लॅमरजगतात एकमेकांशी स्पर्धा करण्यात बिझी असलेले कलाकार एकमेकांचे कधी कट्टर वैरी बनतात हे त्यांना देखील कळत नाही.वारंवार आपण कलाकारांमध्ये रंगलेल्या कोल्ड वॉरच्या चर्चा ऐकत असतो. टीव्ही इंडस्ट्रीही या गोष्टीपासून काही वेगळी नाही.टीव्ही कलाकारामध्येही एकमेकांशी पटत नसल्याचे पाहाला मिळते.मात्र कधी कधी मालिकेत दिसणारे कट्टर वैरी हे ऑफस्क्रीन मात्र खूप चांगले मित्र असतात.‘साम दाम दंड भेद’ या मालिकेत सोनल वेंगुर्लेकर आणि ऐश्वर्या खरे या एकमेकींच्या कट्टर वैरी असल्याचे मालिकेत पाहायला मिळते. पण वास्तव जीवनात या दोघी एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रिणी बनल्या आहेत.

Web Title: Vijay was in jail because he was bullied to help, Luke!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.