VIDEO: 'रात्रीस खेळ चाले ३'मध्ये येणार नवीन ट्विस्ट, होणार या व्यक्तीची एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 13:25 IST2021-03-25T13:25:21+5:302021-03-25T13:25:59+5:30

'रात्रीस खेळ चाले ३'त नुकतीच माई आणि माधवची मालिकेत एन्ट्री झाल्यानंतर आता या व्यक्तीची एन्ट्री होणार आहे.

VIDEO: A new twist will come in 'Ratris Khel Chale 3', this person's entry will happen | VIDEO: 'रात्रीस खेळ चाले ३'मध्ये येणार नवीन ट्विस्ट, होणार या व्यक्तीची एन्ट्री

VIDEO: 'रात्रीस खेळ चाले ३'मध्ये येणार नवीन ट्विस्ट, होणार या व्यक्तीची एन्ट्री

रात्रीस खेळ चाले मालिकेच्या पहिल्या आणि दुसऱ्या सीझनने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यानंतर आता या मालिकेचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या मालिकेच्या तिसऱ्या भागाच्या प्रोमोंनी पहिल्यापासून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. मालिकेत एकेक पात्रांची एन्ट्री होत आहेत. नुकतीच माई आणि माधवची नुकतीच मालिकेत एन्ट्री झाल्यानंतर आता अभिरामची एन्ट्री होणार आहे.

झी मराठीने नुकताच नवीन प्रोमो शेअर केला आहे. हा प्रोमो शेअर करत लिहिले की, अभिराम आलाय पण माईची दयनीय अवस्था इतक्या लवकर खरंच दूर होईल ? या प्रोमोमध्ये पहायला मिळतंय की, माईंना वाडा विकायचा नाही. माईंना पैसे देऊन सुशल्या बळजबरीने वाडा बळकवण्याचा प्रयत्न सुरू असतो. तितक्यात तिथे अभिरामची एन्ट्री होते आणि तो हे कारस्थान हाणून पाडतो. या प्रोमोतून पहायला मिळाले की, तुला पाहते रे फेम अभिनेत्री पूर्णिमा डे या मालिकेत सुषमाच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे.


दरम्यान झी मराठी वाहिनीने आणखी एक प्रोमो शेअर केला आहे. ज्यात अभिरामच्या बायकोसोबत वाड्यात काहीतरी विचित्र घडते. त्यानंतर ती तापाने फणफणते. त्यामुळे वाड्यात अजूनही कोणीतरी वास्तव करतेय, असा प्रश्न उपस्थित होतो. 

अशी रंगणार नाईक वाड्याची कथा
अण्णा नाईकांच्या पापांमुळे त्यांना आणि त्यांच्या पुढच्या पिढीला अत्रुप्त आत्म्यांनी दिलेले शाप भोगावे लागले. अण्णा नाईकांच्या पुढच्या पिढीची पुरती वाट लागली आहे.
अतृप्त आत्म्यांनी नाईक वाड्याचा ताबा घेतला. एक नांदते घर रसातळाला गेलं. पण या आलेल्या वादळात अण्णा नाईकांची बायको, इंदू उर्फ माई नाईक घराण्याच्या मूळ पुरुषावर आणि कुलदैवतेवर भार टाकून सगळ्या संकटांशी शेवटपर्यंत लढते. आपल्या उध्वस्त झालेल्या घराण्याला शाप मुक्त होण्यासाठी उ:शाप मिळवते. एक अशिक्षित स्त्रीसुद्धा आपला स्वाभिमान जपून, संपूर्ण घराला पुन्हा उभं करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगते आणि त्यात जिंकून दाखवते. त्याची ही एक रंजक कथा असणार आहे.

Web Title: VIDEO: A new twist will come in 'Ratris Khel Chale 3', this person's entry will happen