VIDEO: काजूच्या बोंडूचं भरीत कसं बनवायचं? ऐश्वर्या नारकर यांची झटपट रेसिपी एकदा पाहाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 13:41 IST2025-04-14T13:41:04+5:302025-04-14T13:41:30+5:30
Aishwarya Narkar : अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी सोशल मीडियावर काजूच्या बोंडूचं भरीत याची रेसिपी शेअर केली आहे. त्यांच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

VIDEO: काजूच्या बोंडूचं भरीत कसं बनवायचं? ऐश्वर्या नारकर यांची झटपट रेसिपी एकदा पाहाच
ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री. त्यांनी आतापर्यंत विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले आहे. त्या आणि त्यांचे पती अविनाश नारकर सोशल मीडियावर सक्रीय आहेत आणि ते रिल बनवताना दिसतात. त्यांच्या या वयातील उत्साह आणि एनर्जी पाहून चाहते नेहमी कौतुक करत असतात. दरम्यान आता अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी सोशल मीडियावर काजूच्या बोंडूचं भरीत याची रेसिपी शेअर केली आहे. त्यांच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
ऐश्वर्या नारकर यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात काजूच्या बोंडूचं भरीत बनवताना दिसत आहेत. त्यांनी हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, काजूच्या बोंडूचं भरीत... या व्हिडीओत ऐश्वर्या नारकर कोकणात गेल्याचं पाहायला मिळत आहेत. यात त्यांनी लालसर काजूचे बोंड काढून आणले आणि ते विळीवर कापले. त्यानंतर कुकरमध्ये शिजवून घेतले. त्यानंतर त्याच्यामध्ये दोन मिरच्या चुरून टाकायच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडं दही, चवीपुरतं मीठ आणि थोडी साखर टाकून छान मिक्स करून घ्यायचे आहे. मग थोडंसं तूप आणि जिरे, हिंग टाकून फोडणी त्यात टाकायची. मिक्स करून घ्यायचे. अशापद्धतीने ऐश्वर्या नारकर यांनी छान बोंडूच्या भरीत बनवून दाखवलं आहे.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
ऐश्वर्या नारकर यांच्या बोंडूच्या भरीताच्या व्हिडीओला चाहत्यांची खूप पसंती मिळत आहे. ते या व्हिडीओवर कमेंट्स करत आहेत. एकाने लिहिले की, खूप छान भाजी. आम्ही पण बनवून बघू. दुसऱ्या एका युजरने लिहिले की, रेसिपी अन तुम्ही त छानच, पण तुमच्या आसपासचा परिसर,कोकिळेचा आवाज. आणखी एकाने लिहिले की, मस्त काजूची बोंड बघुनच तोंडाला पाणी सुटलं..
वर्कफ्रंट
ऐश्वर्या नारकर यांनी अनेक चित्रपट, मालिका, नाटकात काम केले आहे. येल्लो, झुळूक या चित्रपटातील त्यांच्या भूमिकांचे कौतुक करण्यात आले आहे. शेवटच्या त्या सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत पाहायला मिळाल्या. या मालिकेने नुकतेच निरोप घेतला आहे. यात त्या निगेटिव्ह भूमिकेत दिसल्या होत्या.